- सुमेध वाघमारेनागपूर : वैवाहिक व कौटुंबिक समस्या, एकाकीपणाची भावना त्यातून येणारे नैराश्य व ताणतणाव यामुळे गृहिणींमध्ये आत्महत्येची भावना वाढीला लागली आहे. गेल्या वर्षी आयुष्याला कंटाळून आत्महत्येचा विचार करणाऱ्या व प्रयत्न केलेल्या १२७ महिला आढळून आल्या. याशिवाय गेल्या सहा महिन्यांत २६ नव्या महिलांची नोंद प्रादेशिक मनोरुग्णलायात झाली आहे. यामुळे गृहिणींकडे लक्ष द्या, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.नैराश्यातून आत्महत्येकडे वळणाºयांची संख्या मोठी आहे. भारतात आठ व्यक्तींमागे एक जण नैराश्यग्रस्त आहे. एका अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख लोक आत्महत्या करतात. त्यामधील ४० टक्के पुरुष व ५९ टक्के महिला आहेत. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या २.५ टक्क्यांनी वाढते आहे. तज्ज्ञाच्या मते, वेळीच उपचाराला सुरुवात केल्यास नैराश्य ते आत्महत्या हा प्रवास टाळता येऊ शकतो.नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून ‘आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम’ हाती घेतला. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१७-१८ या वर्षात ३३१ तर गेल्या सहा महिन्यांत ७२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.>गृहकलहामुळे आत्महत्येचा विचार, प्रयत्नगृहकलहामुळे ४५ टक्के गृहिणी आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न करतात. वित्तीय हानीमुळे ३० टक्के, दुर्धर आजारामुळे २० टक्के, जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे ३ टक्के तर परीक्षेत नापास झाल्याच्या कारणामुळे २ टक्के गृहिणी आत्महत्येस प्रवृत्त होतात.
नैराश्य व ताणतणावामुळे गृहिणींना जगणे नकोसे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 5:24 AM