माेलकरणींचे काम करणाऱ्यांमध्ये अनुसूचित जातीच्या ५२ टक्के महिलांचा समावेश आहे. त्या खालाेखाल २४ टक्के ओबीसी, १८ टक्के एसटी तर ६ टक्के खुल्या प्रवर्गातील आहेत.
- ६४ टक्के महिलांचे कुटुंब कच्च्या घरात तर २२ टक्के महिलांकडे पक्के घर आहे. काही झाेपड्यात तर अनेक भाड्यांच्या घरात राहतात.
- ५६ टक्के महिलांची मिळकत ३००० रुपयाच्या वर आहे. २६ टक्के दाेन ते अडीच हजार कमावितात.
- ४२ टक्के महिलांचे कामाचे ठिकाण एक किमीवर आहे. ३२ टक्के २ किमी तर १६ टक्क्यांचे ५ किंवा त्यापेक्षा अधिक किमीवर आहे. ८६ टक्के महिला पायीच कामावर जातात.
- ३४ टक्के महिलांकडे बीपीएल कार्ड, ५२ टक्के एपीएल कार्ड तर १२ टक्के महिलांकडे अंत्याेदयाचे कार्ड आहे.
- ९२ टक्के महिलांना पाठदुखीचा त्रास. ७० टक्के महिलांमध्ये हिमाेग्लाेबीनची कमतरता. ३८ टक्के महिलांच्या पायांना भेगा. केवळ ५० टक्के महिला सरकारी रुग्णालयात जातात. ९४ टक्के महिला मानसिक आजाराचा सामना करतात.