शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

परप्रांतीय गुन्हेगारांना कसे घालणार वेसण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:40 AM

पाोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होणाऱ्या दुसºया राज्यातील गुन्हेगारांवर वचक बसवण्यात नागपूर पोलीस अपयशी ठरत आहे. पोलिसांकडे अशा गुन्हेगारांवर नजर ठेवण्याची यंत्रणाच नाही.

ठळक मुद्दे पोलीस हतबललक्ष ठेवणारी यंत्रणाच नाही

जगदीश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होणाऱ्या दुसऱ्या राज्यातील गुन्हेगारांवर वचक बसवण्यात नागपूर पोलीस अपयशी ठरत आहे. पोलिसांकडे अशा गुन्हेगारांवर नजर ठेवण्याची यंत्रणाच नाही. त्यामुळे गुन्हेगार सर्रासपणे गुन्हे करतात आणि फरार होतात. दीड वर्षानंतर उघडकीस आलेल्या यासीन कुरैशी गोळीबार प्रकरणातूनही हा प्रकार उघडकीस आला आहे.यासीन कुरैशी प्रकरणाचा सूत्रधार मोमीनपुरा येथील एक गुन्हेगार होता. त्याने चित्रकुट उत्तर प्रदेश येथील बच्चा ऊर्फ नानबाबू कुशवाह याच्या माध्यमातून हे प्रकरण घडवून आणले होते. बच्चा हा शहरातील गुन्हेगारी जगतातील कुख्यात नाव होते. त्याने जवळपास १० वर्षे नागपुरात अनेक गुन्हे केले. यापैकी केवळ दोन-चार मोठे गुन्हेगारच पोलिसांच्या रेकॉर्डवर आहेत. त्याने २००९ मध्ये सर्वप्रथम लखोटिया बंधू हत्याकांड केले. या हत्याकांडामुळे शहरातील व्यापारी जगत हादरून गेले होते. लखोटिया हत्याकांडात बच्चा आणि त्याच्या साथीदारांना शिक्षाही झाली होती. जामिनावर सुटल्यानंतरही त्याने अनेक गंभीर गुन्हे केले. परंतु एखाद दुसºयाच प्रकरणात पोलिसांना त्याचा हात आढळून आला. त्याने २०१४ मध्ये साथीदारांच्या मदतीने सिव्हिल लाईन्स येथील सुपारी व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकला होता. कुटुंबीयांना बंधक बनवून लुटले होते. या घटनेनंतर तो चित्रकूटला फरार झाला. चित्रकूटमध्ये बच्चाचा मोठा दबदबा आहे. पोलिसांनाही याची कल्पना होती. यूपीतील दहशतवादविरोधी पथक (एटीएस)च्या मदतीने त्याला पकडण्यात आले.दरोडा प्रकरणातून सुटल्यानंतर बच्चा हा पाचपावलीतील गोळीबार प्रकरणात सहभागी असल्याचे आढळून आले. वाडीतील एका गुन्हेगाराकडून देशी कट्टा विकत घेऊन तो पाचपावलीत आला होता. अचानक ट्रिगर दाबल्या गेल्याने तो जखमी झाला होता. यामुळेच ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाच्या तपासातून बच्चा देशी कट्टा विकणाऱ्यांची टोळी चालवित असल्याचेही पुढे आले होते. त्यानंतरही पोलीस त्याला शोधू शकले नाही. त्यावेळी बच्चाच्या टोळीत उत्तर प्रदेशातील अनेक कुख्यात गुंड सहभागी होते. तो खापरखेड्यातील एका वाळू माफियाच्या मदतीने शहर आणि ग्रामीण भागात लपून होता. याची माहिती असूनही पोलीस काहीच करू शकले नाही. दरम्यान बच्चा आणि त्याचे साथीदार नागपूरसह उत्तर प्रदेशात अनेक मोठे गुन्हे करत राहिले. फरार असताना बच्चाने कानपूरचा साथीदार सुरेंद्र यादव याच्या मदतीने यासिन कुरेशीवर गोळीबार केला होता.सुरेंद्र इंजिनियर बनण्यासाठी नागपूरला आला होता. नंदनवनमधील दर्शन कॉलनीत राहून इंजिनियरिंगमध्ये त्याने प्रवेश घेतला होता. विद्यार्थ्याच्या नावावर तो ‘बच्चा गँग’मध्ये सामील झाला.१२ सप्टेंबर २०१६ रोजी यासिनवर गोळी चालवल्यानंतर सुरेंद्र बच्चासोबत यूपीला पळून गेला. बच्चाने चित्रकूट आणि सुरेंद्रने कानपूरमध्ये गुन्हेगारी सुरू केली. दोघेही कधीही नागपूरला परत येऊन पुन्हा दहशत पसरवतील, या शंकेने पोलीस कधी-कधी कानपूर व चित्रकूटला जाऊन परत येत असत.सुरेंद्रच्या धर्तीवर बच्चा मजबूत आणि चलाख युवकांना आपल्या टोळीत सामील करून घेत असे. त्यांच्या माध्यमातून तो मोठे गुन्हे करीत असे.लखोटिया हत्याकांड आणि सिव्हिल लाईन्समध्ये झालेला दरोड्याशिवाय कुठल्याही प्रकरणात पोलीस बच्चाला पकडू शकले नाही. पाच महिन्यांपूर्वी बच्चाचा संशयास्पद मृत्यू झाला. तेव्हापासून त्याची टोळी कमजोर झाली.यामुळेच सुरेंद्र यादव पोलिसांच्या हाती लागला. सुरेंद्रचे कानपूरमध्ये तीन घर आहेत. त्याला शोधण्यासाठी अजनी पोलिसांना कानपूरमध्येच अनेक दिवस घालवावे लागले. कानपूर पोलिसांना याची माहितीही लागू दिली नाही. त्यामुळेच त्याला पकडण्यात पोलीस यशस्वी होऊ शकले.

बाहेरच्या गुन्हेगारांच्या टार्गेटवर शहरकाही वर्षांपासून नागपूर शहर हे बाहेरच्या गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहे. मण्णपूरम गोल्ड दरोडा प्रकरण याचे उदाहरण आहे. २८ सप्टेंबर २०१६ रोजी बिहार येथील कुख्यात सुबोध सिंह गँगने जरीपटका येथील मण्णपूरम गोल्ड फायनान्स कार्यालयावर दरोडा टाकून ३० किलो सोन्याचे दागिने आणि तीन लाख रुपये लुटले होते. बहुचर्चित जेल ब्रेक’ प्रकरणातील आरोपी बैतुलचा बबलू ऊर्फ फुटबॉल नावाच्या गुन्हेगाराला पोलीस शोधू शकले नाही. अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी आठ महिन्यांपूर्वीच इंटर स्टेट क्राईम कॉन्फ्रन्स आयोजित करण्यात आली होती, हे विशेष.

शेवटपर्यंत नाही लागला हातीबच्चा कुशवाह उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर बक्षीसही जाहीर होते. चित्रकूटमध्ये त्याचा दबदबा होता. डिसेंबर २०१७ मध्ये त्याचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. पोलिसांनी रस्ता अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना सांगितले. बच्चाचा मृत्यू झाल्याचे माहीत होताच नागपूर पोलीसही सक्रिय झाले आणि सुरेंद्रला अटक केली.

टॅग्स :Crimeगुन्हा