शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

नैसर्गिक आपत्तीत कशी मिळणार आरोग्य सेवा ?

By admin | Published: October 21, 2015 3:37 AM

शहर वाढत आहे; त्यातुलनेत शहरातील रुग्णालयांची संख्या अपुरी पडत आहे. शहरात सर्व मिळून ६५६ रुग्णालयांमध्ये १० हजार ६४५ खाटांची संख्या आहे.

२३५ नागरिकांमागे केवळ एकच खाट : एकाचवेळी ११ हजारावरील रुग्णांवर उपचार अशक्यच नागपूर : शहर वाढत आहे; त्यातुलनेत शहरातील रुग्णालयांची संख्या अपुरी पडत आहे. शहरात सर्व मिळून ६५६ रुग्णालयांमध्ये १० हजार ६४५ खाटांची संख्या आहे. २५ लाख लोकसंख्येच्या तुलनेत प्रति २३५ नागरिकांमध्ये १ खाट असे प्रमाण येत आहे. शहरात दुर्दैवाने एखादे नैसर्गिक संकट आले आणि त्यामध्ये ११ हजारावरील नागरिक पीडित झाले तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. नागपूर हे स्मार्ट सिटी होईल. यामुळे येथे ‘धन्वंतरीचे पाईक’ रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणार कुठे हाच प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. २०११ साली २० लाख लोकसंख्या असलेले नागपूर शहर २५ लाख लोकसंख्येच्या पुढे सरकले आहे. शहरात मनपाचे ३७ दवाखाने, १२ हेल्थ पोस्ट व १० माता-बाल संगोपन केंदे्र आहेत. यातील महापालिकेच्या पाचपावली दवाखान्यात १०, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ८० तर इमामवाडा येथील आयसोलेशन दवाखान्यात ४० खाटा अशा एकूण १३० रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था आहे. शहरात तीन शासकीय रुग्णालये महत्त्वाची आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) खाटांची संख्या १ हजार ४०० आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) खाटांची संख्या ५९० आहे, तर डागा रुग्णालयात ३३५ खाटांची सोय आहे.शहरात ६५० खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये एकूण ८ हजार १९० खाटा उपलब्ध आहेत. मात्र, या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेली आरोग्यसेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे खासगी रुग्णांलयांमध्येही आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव खाटांची संख्या कशी वाढविता येईल, सामान्यांनाही कमी खर्चात दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ कसा मिळवून देता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)३८ हेल्थ पोस्टची आवश्यकता५० हजार लोकसंख्येमागे एक हेल्थ पोस्ट असावे, असे शासनाचे प्रमाण आहे. महापालिकेचे १२ हेल्थ पोस्ट आहेत. आणखी ३८ हेल्थ पोस्टची शहराला गरज आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज आहे, मात्र शासनाचे अद्यापही याकडे लक्ष नाही.प्रत्येक मतदारसंघात हवे दोन हजार रुग्णक्षमतेचे रुग्णालय १९८५ च्या तुलनेत सध्या शहराचा विस्तार चारही दिशेने झाला आहे. १५ लाख लोकसंख्या असलेले हे शहर ३० लाखांच्यावर गेले आहे. यातील सुमारे चार लाख नागरिक शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानकातून दररोज ये-जा करतात. शहरात सहा विधानसभा मतदारसंघ झाले. प्रत्येक मतदारसंघात अडीच लाखांच्या आसपास मतदार आहेत. यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन हजार रुग्णक्षमता असलेल्या रुग्णालयाची गरज आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांवर नजर टाकल्यास एकाही रुग्णालयात अत्याधुनिक सोई नाहीत. येथील रुग्णालयाची भिस्त जुन्याच सोर्इंवर आहे. यातच मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे वाढलेले शुल्क, औषधांचा तुटवडा, कमी मनुष्यबळ व सोर्इंचा अभाव असल्याने गरीब रुग्णांचे हाल होत आहेत.