शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

नागपुरातील हिवाळी अधिवेशन काळात कोरोना टेस्टिंगचे गणित कसे जमविणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:18 AM

Nagpur News Corona winter session अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळालेले नसताना नागपुरातील हिवाळी अधिवेशन काळात विधिमंडळ परिसराला कोरोनामुक्त ठेवण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.

ठळक मुद्देविधीमंडळातच लागणार हजारो किट्सवैद्यकीय तज्ज्ञांच्या कमतरेचेदेखील आव्हान

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळालेले नसताना विधिमंडळ परिसराला कोरोनामुक्त ठेवण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. परिसराच्या आत येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करावी लागणार आहे. अशा स्थितीत विधिमंडळातच हजारो किट्स लागून जातील. अगोदरच अपुऱ्या किट्सअभावी चाचण्या वाढू शकलेल्या नाहीत. अशा स्थितीत जनतेच्या चाचण्यावर अधिवेशनकाळात प्रभाव पडण्याची शक्यता आहे.मुंबईमध्ये दोन दिवसाचे अधिवेशन झाले व त्यात प्रत्येक पासधारकाची चाचणी करण्यात आली. त्यात मंत्री, आमदार, स्वीय सहायक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांचा समावेश होता. ५० हून अधिक लोक त्यात पॉझिटिव्हदेखील आढळले होते. नागपुरातील अधिवेशन हे कमीत कमी एक आठवडा तरी चालविण्याचा विचार सुरू आहे. एखाद्या व्यक्तीची पास देताना एकदाच चाचणी करणे पुरेसे ठरणार नाही. संपूर्णपणे कोरोनामुक्त परिसर ठेवायचा असेल तर परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची दररोज चाचणी करणे आवश्यक ठरणार आहे. जर एकदा जरी चाचणी केली तरी हजारो किट्स लागतील आणि जर दररोज चाचणीचा निर्णय झाला तर ही संख्या आणखी वाढेल.नागपुरात अजूनही दैनंदिन चाचण्यांची संख्या सात हजारांच्या पुढे गेलेली नाही. अशा स्थितीत अधिवेशन काळात या अतिरिक्त किट्सचे गणित जमविणार कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.वैद्यकीय मनुष्यबळ कुठून आणणार ?आजच्या स्थितीत राज्यभरात कोरोनाची दहशत कायम आहे. प्रत्येक ठिकाणीच वैद्यकीय मनुष्यबळ कमी पडत आहे. उपराजधानीतदेखील हीच स्थिती आहे. अधिवेशन काळात चाचण्यांसाठीदेखील मनुष्यबळ लागेल. बाहेरील शहरांतून वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी बोलविले तर संबंधित ठिकाणी अडचण निर्माण होईल. नागपुरातील यंत्रणा अधिवेशनात राबविली तर येथील आरोग्य व्यवस्था कोलमडेल. त्यामुळे अतिरिक्त वैद्यकीय मनुष्यबळ आणणार कुठून हे शासनाला निश्चित करावे लागणार आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस