शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

किती हे क्रौर्य, मुलाने आईची गळा दाबून केली हत्या, मृतदेहाने दिले हत्येचे संकेत

By योगेश पांडे | Published: October 20, 2023 9:49 PM

दुसऱ्या मुलाच्या सतर्कतेमुळे समोर आली घटना :

नागपूर : मोबाईलवरून झालेल्या वादानंतर संतापलेल्या मुलाने स्वत:च्या आईची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर ‘तो मी नव्हेच’ असे दाखवत आईच्या अंत्यसंस्काराच्या तयारीलादेखील लागला. मात्र मृतदेह कडक होत असल्याने तूप लावत असताना लहान मुलाला गळ्यावर जखमेची खूण दिसली व त्यानंतर हत्येची बाब समोर आली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

कमलाबाई गुलाबराव बडवाईक (४७, श्री संत गजानन महाराज नगर) असे मृतक महिलेचे नाव आहे. कलमाबाई यांचा पती फार अगोदर घर सोडून निघून गेला होता. त्या मोठा मुलगा रामनाथ (२८) याच्यासोबत राहत होत्या. तर लहान मुलगा दीपक (२६) हा मनिषनगरात राहतो. १८ ऑक्टोबर रोजी दीपकला त्याच्या मित्राने फोन करून आईची प्रकृती खराब झाल्याने रामनाथने दवाखान्यात नेल्याची माहिती दिली. दीपक दवाखान्याकडे निघाला असता त्याच्या बायकोचा फोन आला व आई मरण पावल्याचे तिने सांगितले. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना दीपकच्या जावयाला कमलाबाई यांचा मृतदेह कडक होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी कापूर व तेल लावण्यास सांगितले. त्यानुसार दीपक तेल लावत असताना त्याला कमलाबाई यांच्या गळ्याजवळ जखम दिसली.

तसेच डाव्या हाताच्या अंगठ्याला शाई लागली होती. त्यांच्या अंगावरील दागिनेदेखील गायब होते. याबाबत रामनाथला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे दीपकला मोठ्या भावावर संशय आला व त्याने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कमलाबाई यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचा अहवाल दिला. रामनाथच्या शेजाऱ्यांनी त्याचे कमलाबाईंशी फोनवर भांडण झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी यावरून रामनाथला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने वादातून आईचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी रामनाथला अटक केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी