भिवापूर : विद्युत वितरण कंपनीमार्फत कंत्राटी कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात लावलेले सोलार कृषी पंप गत कित्येक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करून शेतकरी थकला. मात्र, अद्यापही सोलार पंपाची दुरुस्ती करण्याचे कौशल्य कंत्राटदार कंपनीने दाखविलेले नाही. त्यामुळे शेतात सिंचन करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
सरांडी येथील शेतकरी सुरेश येवले यांनी दोन एकर शेतात सोलार कृषी पंप बसविले. त्यासाठी आवश्यक रकमेचा त्यांनी भरणाही केला. त्यानंतर विद्युत वितरण कंपनीमार्फत कंत्राटदार कंपनीने येवले यांच्या शेतात सोलार कृषी पंप लावले. मात्र, तेव्हापासून सोलार पंप शेतकऱ्याच्या शेतात बंद अवस्थेत आहे. नादुरुस्त सोलार पंप तात्काळ दुरुस्त करून शेतातील पिकांना सिंचनाची सुविधा मिळावी. यासाठी शेतकरी संबंधित कंत्राटदार व विद्युत वितरण कंपनीकडे सतत चकरा मारत आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्याच्या समस्येकडे कुणी लक्ष दिले नाही.
270821\img-20210824-wa0007.jpg
शेतात बंद अवस्थेतील सोलर पंपसह पिडीत शेतकरी