राजीव सिंग।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजविण्यासाठी नवीन हॉटमिक्स प्लांट भांडेवाडी येथे सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या विचाराधीन होता. परंतु तो फाईलमध्ये अडला. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात एमआयडीसी, हिंगणा येथील एकमेव हॉटमिक्स प्लांटची क्षमता वाढवून प्रतितास १२० टन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, परंतु अद्याप क्षमता वाढलेली नाही. त्यामुळे १७ वर्षे जुना असलेल्या एका हॉटमिक्स प्लांटच्या भरवशावर शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.महापालिकेच्या हॉटमिक्स प्लांटची क्षमता वाढविल्यास शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजविल्यास निधीची मोठ्या प्रमाणात बचत शक्य आहे. मात्र यामुळे कंत्राटदाराचे नुकसान होणार असल्याने महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यासाठी उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.वास्तविक तत्कालीन महापौर प्रवीण दटके व तत्कालीन मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी एमआयडीसी येथील हॉटमिक्स प्लांटची क्षमता ३० टीपीएचवरून १२० करून नवीन प्लांट सुरू करणे, तीन नवीन पॅचर मशीन, दोन रोडरोलर व २० टिप्पर खरेदी करण्याचा विचार केला होता. यावर ६.५० कोटींचा खर्च होणार होता. परंतु या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी कोणीच तयार नव्हते.१७ वर्षांपूर्वीचा एकच प्लांट सुरूरस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने हिंगणा एमआयडीसी येथे ३० टीपीएच क्षमतेचा ड्रम मिक्स प्लांट १७ वर्षांपूर्वी सुरू केला होता. दरवर्षी हॉटमिक्ससाठी दोन कोटींचे डांबर व गिट्टी खरेदी क रण्यात येते. वास्तविक हॉटमिक्स प्लांटची क्षमता वाढविल्यास महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते.काम करताना अडचणीएमआयडीसी येथील एकच प्लांट सुरू आहे. त्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील वा शहराच्या दुसºया टोकावरील कामे करावयाची झाल्यास याला वेळ लागतो तसेच दुरुस्तीचे काम करणाºयांना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे भांडेवाडी येथील प्लांट सुरू करणे गरजेचे होते. परंतु राजकारणामुळे यासाठी जागा उपलब्ध झाली नाही, अशी माहिती एका अधिकाºयाने दिली.
एकच हॉटमिक्स तर खड्डे बुजविणार कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 1:13 AM
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजविण्यासाठी नवीन हॉटमिक्स प्लांट भांडेवाडी येथे सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या विचाराधीन होता.
ठळक मुद्देभांडेवाडीचा प्रस्ताव बारगळला : मनपाचा खर्चही वाढला