शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

अधिवेशन किती दिवसांचे, आज शिक्कामोर्तब होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:17 AM

नेमके किती दिवसांचे अधिवेशन राहील, यावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. मंगळवारी मुंबईला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून, यात अधिवेशनाचे कामकाज नेमके किती दिवसांचे राहील, यावर शिक्कामोर्तब होईल.

ठळक मुद्देमुंबईत कामकाज सल्लागार समितीची बैठक

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : यंदाचे हिवाळी अधिवेशन हे सहा दिवसाचे राहील, असे सांगितले जात असले तरी कामकाज मात्र ठरलेले नाही. त्यामुळे नेमके किती दिवसांचे अधिवेशन राहील, यावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. मंगळवारी मुंबईला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून, यात अधिवेशनाचे कामकाज नेमके किती दिवसांचे राहील, यावर शिक्कामोर्तब होईल.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. त्यांना विरोधकांच्या धारदार प्रश्नांनाही सामोरे जावे लागेल. मुख्यमंत्री याला कशाप्रकारे प्रतिउत्तर देतात, हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. हे अधिवेशन सहा दिवसांचेच असणार असल्याची चर्चा आहे. यावरून सरकारवर टीकाही होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नागपुरातील पहिले अधिवेशन सव्वादोन आठवडे चालले होते. त्यामुळे यावेळी किमान दोन आठवडे तरी अधिवेशन चालावे, अशी मागणी होत आहे. उद्या मंगळवारला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईला होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते. या बैठकीला मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेते व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. ख्रिसमसपूर्वी अधिवेशन संपविण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे एकच आठवडा हे अधिवेशन चालणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी एकदा अधिवेशन सहाच दिवस चालले आहे. विरोधी पक्षाने आग्रही भूमिका घेतल्यास अधिवेशनाच्या कामकाजात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर