लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला नोटीस बजावून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एका चौकात किती पोलीस तैनात केले जातात, शहरातील रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक कोणत्या वेळी असते आणि शहरात किती महत्त्वाचे चौक आहेत, याची माहिती तीन आठवड्यात सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शहरातील चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कुणी वाहतूक नियम तोडताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. असे असले तरी वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. परंतु, बरेचदा वाहतूक पोलीस रोडच्या बाजूने मोबाईल पाहताना दिसून येतात. वाहन चालक त्याचा फायदा घेऊन वाहतूक नियम तोडतात. असे चित्र नेहमीच पाहायला मिळत असल्यामुळे उच्च न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. गेल्या तारखेला न्यायालयाने या मुद्यावरून सरकारला फटकारले होते. तसेच, यानंतर कर्तव्यावरील वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रित करणे सोडून मोबाईल पाहताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर कर्तव्यात कसूर करणाºया ११ पोलिसांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अॅड. श्रीरंग भांडाकर न्यायालय मित्र आहेत.
एका चौकात किती वाहतूक पोलीस तैनात केले जातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 8:02 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला नोटीस बजावून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एका चौकात किती पोलीस तैनात केले जातात, शहरातील रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक कोणत्या वेळी असते आणि शहरात किती महत्त्वाचे चौक आहेत, याची माहिती तीन आठवड्यात सादर करण्यास सांगितले.
ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : राज्य सरकारला मागितले उत्तर