नागपूर विद्यापीठ : शासन व विधिमंडळात समन्वयाचा अभावनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेवर (सिनेट) आ. समीर मेघे व आ.डॉ.मिलिंद माने यांना राज्य विधानसभेतर्फे नामनिर्देशित करण्यात आले आहे. परंतु प्राधिकरणांमधील रिक्त पदे ३१ आॅगस्टपर्यंत कुठल्याही परिस्थितीत भरण्यात येऊ नयेत, असे निर्देश राज्य शासनातर्फेच देण्यात आले होते. राज्य शासन व विधिमंडळात समन्वयाचा अभाव दिसत असल्याची भावना विद्यापीठ वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी समीर मेघे व डॉ. मिलिंद माने यांचे २१ डिसेंबर २०१५ रोजी विद्यापीठाच्या विधिसभेवर नामनिर्देशन केले. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाला सूचना पाठविण्यात आली व १ जानेवारी रोजी नागपूर विद्यापीठाने याबाबत अधिसूचना जारी केली. परंतु ही अधिसूचना जारी करीत असताना नागपूर विद्यापीठ प्रशासनातील अधिकारी मात्र संभ्रमात पडले होते. याला कारण होते राज्य शासनाने राज्यातील सर्व प्राधिकरणांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत जारी केलेला शासन निर्देश.३१ आॅगस्ट २०१५ रोजी विधिसभेच्या सदस्यांचा कालावधी संपुष्टात आला. नियमांनुसार त्यानंतर विविध प्राधिकरणांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते.
सिनेटवर आमदारांचे नामनिर्देशन कसे ?
By admin | Published: January 06, 2016 3:47 AM