लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला मालमत्ता कर विभाग कर वसुलीच्या कामाला लागला आहे. परंतु यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. थकबाकी वसुलीला प्रतिसाद नाही. शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध कार्यालयांचाही समावेश आहे. मार्च अखेरीस २९२ .१९ कोटींची वसुली अपेक्षित असताना फे ब्रुवारी अखेरीस कर वसुलीतून १३७. ४८ कोटींचा महसूल जमा झाला. त्यामुळे महिनाभरात २५५ कोटींची वसुली कशी होईल, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी वर्ष २०१७-१८ या वर्षाचा २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात मालमत्ताकरापासून ३९२.१९ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु गुरुवारपर्यत मालमत्ताकरापासून १३७.४८ कोटींची वसुली झाली. सध्याची परिस्थिती विचारात घेता ३१ मार्चपूर्वी २५५ कोटींची वसुली अवघड असल्याचे चित्र आहे.२ लाखांच्या आसपास डिमांड जारी करण्यात आलेल्या आहेत. मालमत्ता सर्वेक्षणाची प्रक्रिया ठप्पच आहे. ४२ टक्के मालमत्ताचे सर्वेक्षण शिल्लक आहे. सर्वेक्षण झाले नसल्याने ३१ मार्चपूर्वी सर्व डिमांडचे वाटप अशक्य आहे. त्यामुळे कर वसुलीसाठी मालमत्ता विभागाला पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. महापालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाच्या ४० टक्के कार्यालयांनी कर भरलेला नाही. याचाही वसुलीला फटका बसला आहे.
नागपुरात महिनाभरात २५५ कोटींची वसुली कशी करणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 9:56 PM
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला मालमत्ता कर विभाग कर वसुलीच्या कामाला लागला आहे. परंतु यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. थकबाकी वसुलीला प्रतिसाद नाही. शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध कार्यालयांचाही समावेश आहे. मार्च अखेरीस २९२ .१९ कोटींची ...
ठळक मुद्देमालमत्ता विभागापुढे आव्हान : फेब्रुवारी अखेरीस १३७ कोटींची कर वसुली