आॅनलाईन लोकमतनागपूर : ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा फटका अनेक उच्चशिक्षितांना बसतो आहे. जळगाव जिल्ह्यातील दिलीप साळवे हे व्हेटर्नरी डॉक्टर आहेत. सरकारी नोकरीसाठी जंगजंग पछाडले, पण नशिबाला कोतवाली भेटली. आज ते कोतवालांना चतुर्थ श्रेणी द्यावी यासाठी सरकार दरबारी संघर्ष करीत आहे. रोजगाराच्या बाबतीत ग्रामीण भागात असलेली उदासिनता आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोतवाल झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे उपाध्यक्ष असलेल्या दिलीप साळवे यांनी मोर्चाच्या स्थळी कोतवालांची दुरवस्थाच मांडली. वकील आणि कित्येक उच्चशिक्षित आज चौथी पास पात्रता असलेल्या कोतवालाची नोकरी करीत आहे. तलाठ्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कोतवालाला मानधन अत्यल्प असले तरी, त्याच्या कामाचा अवाका व्यापक आहे. पाच गावाची जबाबदारी असलेल्या कोतवालाला कायदा व सुव्यवस्थेबरोबरच आकस्मिक घटना, सरकारी योजनेची माहिती गावोगावी पुरविणे, तहसीलदार सांगेल ते काम करणे, कधी अधिकाऱ्याच्या बंगल्यावर तर कधी तहसील कार्यालयाच्या मुताऱ्याही साफ कराव्या लागतात. त्याबदल्यात मिळतात ५००० रुपये मानधन आणि १० रुपये चप्पल भत्ता. ६८ वर्षांपासून कोतवालांचा संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे कोतवालाला ना पदोन्नती आहे, ना वेतनवाढ. ६८ वर्षात कोतवालाचे मानधन ५००० झाले. २ रुपयाचा चप्पलभत्ता १० रुपये झाला. कित्येक सरकार आले आणि गेले, विरोधात असताना नेत्यांनी कोतवालांच्या प्रश्नावर सभागृह बंद पाडले. हेच विरोधक सत्तेत आले, तेव्हा कोतवालांचे प्रश्न त्यांच्या विस्मृतीस गेले. आजही हे उच्चशिक्षित कोतवाल चतुर्थश्रेणीसाठी मोर्चे, धरणे, आंदोलन करून सरकारदरबारी संघर्ष करीत आहे.
कशी नशिबाने थट्टा आज मांडली ? डॉक्टरला बनविले कोतवाल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:23 AM
ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा फटका अनेक उच्चशिक्षितांना बसतो आहे. जळगाव जिल्ह्यातील दिलीप साळवे हे व्हेटर्नरी डॉक्टर आहेत. सरकारी नोकरीसाठी जंगजंग पछाडले, पण नशिबाला कोतवाली भेटली.
ठळक मुद्देना पदोन्नती, ना वेतनवाढ : १० रुपये मिळतो चप्पल भत्ता