शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

चार महिन्यांत 'समृद्धी'चे २० टक्के काम पूर्ण होणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 11:16 AM

Nagpur News नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला कोरोनामुळे विलंब झाला. मात्र, शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात केला. मात्र, आतापर्यंत या मार्गावर ८० टक्केच काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देनागपूर-शिर्डी मार्ग डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा एकनाथ शिंदेंचा दावा बुलेट ट्रेनबाबत अद्याप कुठलाही विचार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला कोरोनामुळे विलंब झाला. मात्र, शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात केला. मात्र, आतापर्यंत या मार्गावर ८० टक्केच काम पूर्ण झाले आहे. नागपूरकडील भागात अनेक किलोमीटरचे काम योग्य पद्धतीने सुरूच झालेले नाही. अशा स्थितीत चार महिन्यांच शिर्डीपर्यंतचे २० टक्के प्रलंबित काम पूर्ण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (How will 20% of the work of 'Samrudhi' be completed in four months?)

एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी समृद्धी महामार्गाच्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या कामाने आता गती घेतली आहे. २०२२ पर्यंत ठाण्यापर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. या मार्गावर २० ठिकाणी इंडस्ट्रिअल नोडस् राहणार आहेत. शिवाय ११ लाख झाडे लावण्यात येतील व २५० मेगावॅट सौरऊर्जेचीदेखील निर्मिती होईल. या महामार्गावर वाहने १५० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावतील. त्यामुळे सर्वच साहित्य आवश्यक दर्जाचे असावे, याची सूचना देण्यात आली आहे. दर्जासोबतच कुठलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. कोरोनामुळे कामाला विलंब झाला असला तरी महामार्ग बांधणीचा खर्च वाढलेला नाही, असा दावादेखील त्यांनी केला. समृद्धी महामार्गाशेजारीच नागपूर- मुंबई बुलेट ट्रेन सुरू होणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असता सध्या आमचे लक्ष केवळ महामार्गावरच आहे. बुलेट ट्रेनबाबत विचार केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अडथळे आणणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाई

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात शिवसेना नेत्यांमुळे अडथळे येत असल्याचा लेटरबॉम्ब केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टाकला होता. यासंदर्भात विचारणा केली असता समृद्धीमध्ये कुणीही अडथळे आणलेले नाही व भूमी अधिग्रहण योग्य प्रक्रियेनुसार सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. विकासकामांना सर्वांनी साथ द्यायला हवी. राज्य किंवा राष्ट्रीय प्रकल्पांत कुणी अडथळे आणत असेल, तर संबंधित राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

टॅग्स :highwayमहामार्गSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग