शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
2
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
3
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
4
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
5
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
6
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
8
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
9
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
10
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
11
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
12
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
13
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
14
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
15
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
16
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
17
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
18
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
19
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
20
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!

कसे होणार ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न पूर्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 9:20 PM

‘स्वच्छ भारत’ योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ‘सोशल मीडिया’वर ‘चमकोगिरी’देखील सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात नागपूर महानगरपालिकेच्या उदासीन धोरणांमुळे हा निधी पूर्णपणे खर्च करण्याची तसदीदेखील प्रशासनाने घेतलेली नाही. ‘स्वच्छ भारत’अंतर्गत मिळालेल्या एकूण निधीपैकी नागपुरात केवळ २५ टक्के निधी खर्च झाला असून, अद्यापही ७५ टक्के निधी अखर्चित आहे. हे धोरण पाहता, नागपूर खरोखर ‘स्वच्छ’ कधी बनेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देकेंद्र व राज्य शासनाकडून आलेला ७५ टक्के निधी अखर्चित : नागपूर मनपाची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्वच्छ भारत’ योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ‘सोशल मीडिया’वर ‘चमकोगिरी’देखील सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात नागपूर महानगरपालिकेच्या उदासीन धोरणांमुळे हा निधी पूर्णपणे खर्च करण्याची तसदीदेखील प्रशासनाने घेतलेली नाही. ‘स्वच्छ भारत’अंतर्गत मिळालेल्या एकूण निधीपैकी नागपुरात केवळ २५ टक्के निधी खर्च झाला असून, अद्यापही ७५ टक्के निधी अखर्चित आहे. हे धोरण पाहता, नागपूर खरोखर ‘स्वच्छ’ कधी बनेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपा आयुक्त कार्यालयाकडे ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत आलेल्या निधीसंदर्भात विचारणा केली होती. २०१५ पासून केंद्र व राज्य शासनातर्फे या योजनेसाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आला, यातील नेमका किती निधी खर्च झाला, कोणत्या उपक्रमात किती निधी खर्च झाला, यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, ३१ मे २०१८ पर्यंत ‘स्वच्छ भारत’ योजनेंतर्गत एकूण ५५ कोटी ५८ लाख ३ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातील ५२ कोटी ३५ लाख ३९ हजार रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून प्राप्त झाला, तर उर्वरित ३ कोटी २२ लाख ६४ हजारांचा निधी राज्य शासनाकडून मिळाला. संबंधित निधी हा ‘आयएचएचएल’ (इन्डिव्हिज्युअल हाऊसहोल्ड लॅट्रीन), ‘सी.टी.’ (कम्युनिटी टॉयलेट), घनकचरा व्यवस्थापन, प्रचार आणि प्रसार तसेच ‘कॅपेसिटी बिल्डिंग’साठी देण्यात आला. मात्र नागपुरात घरगुती शौचालयासाठी एकूण १३ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तर ‘कॅपेसिटी बिल्डिंग’साठी १ कोटी ३५ लाख ७६ हजार रुपये खर्च करण्यात आले. खर्च करण्यात आलेला एकूण निधी १४ कोटी ३६ लाख ४८ हजार इतका असून, ४१ कोटीहून अधिक निधी अखर्चित होता.मनपाचे गंभीर दुर्लक्षशहरात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर स्वरूप घेत आहे. ‘नीरी’सारख्या संस्थेत याबाबत संशोधन सुरू असून, वैज्ञानिकांनी या प्रश्नाला गंभीरतेने घेण्याची सूचना केली आहे. मात्र नागपूर मनपाने याकडे पूर्णत: दुर्लक्षच केले आहे. ‘स्वच्छ भारत’अंतर्गत आलेल्यापैकी सर्वाधिक निधी केवळ घरगुती शौचालयांसाठी वापरण्यात आला. मात्र घनकचरा व्यवस्थापन, सामुदायिक शौचालय यांच्यासाठी मात्र एकही रुपया खर्च झालेला नाही. शासनाकडून निधी आला असतानादेखील त्याला खर्च का करण्यात आले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहेउपक्रम                        प्राप्त निधी                           खर्च झालेला निधीघरगुती शौचालय            ६,१७,१४,०००                         १३,००,७२,०००सामुदायिक शौचालय      १,१५,५६,०००                               -घनकचरा व्यवस्थापन      ४८,११,६७,०००                            -प्रचार आणि प्रसार           ११,३३,०००                                   -कॅपेसिटी बिल्डिंग            २,३३,०००                                 १,३५,७६,०००

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता