तलावांची स्थिती वाईट
नीरीचा अहवाल तलावांबाबत चिंता करायला भाग पाडणारा आहे. फुटाळा, गांधीसागर, सोनेगावांनी प्रदूषणाची सीमा पार केली आहे. सक्करदरा व नाईक तलावाचे अस्तित्वच संकटात आहे. केवळ अंबाझरी तलावाची स्थिती समाधानकारक आहे. सर्व तलावांचे सर्व प्रकारचे प्रदूषण वाढीस लागले आहे. गढूळपणा, आम्लपणा, पाण्याची कठीणता, सल्फेट, नायट्रेट, फॉस्फेट, धातू-अधातूंचे प्रमाण, सीओडी, बीओडी आणि कॉलिफॉर्म आदी सर्व प्रकारच्या घटकांची तलावांच्या पाण्यात वाढ झाली आहे. घराघरातील सिव्हेज, गटार आणि फेकला जाणारा कचरा हे या प्रदूषणाचे प्रमुख कारण आहेत.
- अंबाझरी तलावात मासे व जैवविविधतेचे समाधानकारक अस्तित्व.
- सर्व तलावांत कॉलिफॉर्मचे प्रमाण अधिक. कॉलिफॉर्म मानवी शरीरातील घटक असून, त्याच्या असण्याने सिव्हेज वाहत असल्याचे लक्षात येते. नाईक तलावात कॉलिफॉर्म ४८० ते ४९० मिग्रॅ/ली. अत्याधिक धोक्यात.
- सोनेगाव, गांधीसागर, अंबाझरीमध्ये सीओडी व बीओडी अधिक.
- सक्करदरा, गांधीसागरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लोराइड, क्लोराइड आदी पोषण घटकांचे प्रमाण अत्याधिक.
- सर्व तलावात मेटल्सचे प्रमाणही वाढत आहे.