नागपूर : रेल्वेगाड्यांचे इंजिन फेल होऊन रेल्वेगाड्या अडकून पडण्याच्या घटनात वाढ झाली आहे. नुकतेच एका मालगाडीचे इंजिन फेल झाल्यामुळे वर्धेत विदर्भ एक्स्प्रेस पाऊण तास अडकुन पडली होती. तर बुधवारी हावडा-अहमदाबाद स्पेशलचे इंजिन फेल झाल्यामुळे ही गाडी एक तास जागेवरच उभी होती. ही घटना कळमनाच्या पुढे नागपूर आऊटरवर घडली. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
मिळालेल्या माहितीनुसार हावडा-अहमदाबाद विशेष रेल्वेगाडी रायपूरवरून नागपूरला येत होती. या गाडीचे इंजिन कळमना रेल्वेस्थानकाच्या पुढे नागपूर आऊटरवर बंद पडले. ही घटना सायंकाळी ६.३० वाजता घडली. याबाबत सूचना मिळताच रेल्वे अधिकाऱ्यात खळबळ उडाली. रेल्वे इंजिन दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हावडा-अहमदाबाद स्पेशलचे इंजिन दुरुस्त करून ही गाडी सायंकाळी ७.२३ वाजता नागपूरकडे रवाना करण्यात आली.
.............