शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

नागपुरातील जंगल्याजी धोंडबाजी फर्मच्या गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 8:56 PM

शहरातील पेंट, तिरपाल, नायलॉन रस्सी, धागे आदींच्या ठोक विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या इतवारी परिसरातील बांगरे मोहल्ला चुना ओळी येथील जंगल्याजी धोंडबाजी फर्म राहुल इंटरप्रायजेसच्या चारमजली गोदामाला मंगळवारी पाहाटे ४.५५ च्या सुमारास भीषण आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पेंट, तिरपाल, नायलॉन रस्सी, धागे आदींच्या ठोक विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या इतवारी परिसरातील बांगरे मोहल्ला चुना ओळी येथील जंगल्याजी धोंडबाजी फर्म राहुल इंटरप्रायजेसच्या चारमजली गोदामाला मंगळवारी पाहाटे ४.५५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दहा गाड्या घटनास्थळी पोहचल्या. परंतु वरच्या मजल्यावरील आग विझविण्याचे कार्य रात्रीपर्यंत सुरू होते.या गोदामाच्या आजूबाजूला व्यापारी परिसर असल्यामुळे इतरत्र दुकानांमध्ये ही आग परण्याची भीती होती. मात्र अग्निशमन विभागाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. माहितीनुसार मेमन जमातपुढील देशी दारू दुकानाजवळील अशोक नाचनकर परिवार यांची चारमजली इमारत आहे. तिचा दुकान व गोदाम म्हणून वापर केला जातो. इमारतीत आग लागल्यानंतर काही वेळात ती चौथ्या माळ्यापर्यंत पोहचली. इमारतीत पेंट तयार केला जात असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या केमिकलमुळे आगीने रौद्ररूप धारण केले.या इमारतीत पहिल्या माळ्यावर दुकान तर वरच्या माळ्यांना गोदामाचे स्वरूप दिले आहे. या गोदामात कोट्यवधी रुपयांचा पेंट, नायलॉन रस्सी आदी सामान ठेवण्यात आले होते. ही सर्व सामग्री लवकर आग पकडणारी असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे भीषण रूप घेता अग्निशमन विभागाला माहिती मिळताच दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु, हा परिसर अरुंद असल्यामुळे विभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना पुढे जावे लागले. अशातच, आग झपाट्याने वाढत असल्यामुळे आणखी दहा बंब घटनास्थळी पोहचले. अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. आग नियंत्रणात असली तरी वरच्या माळ्यावर ती रात्री उशिरापर्यंत धुमसत होती. अखेर ७ तास शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.नाचनकर कुटुंबावर दहा दिवसात दुसरे संकटनाचनकर कुटुंबातील सदस्य गणेश नाचनकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. मंगळवारी त्यांची दशक्रिया होती. याकरिता नाचनकर कुटुंबीय हे रामटेक येथे जाणार होते. परंतु, त्यापूर्वीच आगीची घटना घडली. नाचनकर कुटुंबीयांवर दहा दिवसातच दुसरे संकट कोसळले.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर