लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांच्या वेतनातून दरमहा भविष्य निधीची कपात करण्यात येते. त्याच्या पावत्या शिक्षकांना दिल्या जातात. अनेक शिक्षकांना मिळालेल्या पावत्यांमध्ये भविष्य निधीच्या जमेची नोंद शून्य आहे, तर काही शिक्षकांना पावत्याच मिळाल्या नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांनी शिक्षकांच्या भविष्य निधीत घोळ असल्याची ओरड केली आहे. ही बाब जि.प.च्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.शिक्षकांच्या वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधीची कपात होत असते. याचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाची असते. या विभागातून आर्थिक वर्षअखेर कर्मचाऱ्यांना हिशेबाच्या पावत्या दिल्या जातात. नुकत्याच शिक्षकांना आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या पावत्या मिळाल्या. त्यात अनेक शिक्षकांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात होऊनही पावतीवर शून्य दाखवण्यात आले, तर काही शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगाचे हप्तेसुद्धा जमा करण्यात आले नाही.यावर्षी सन २०१८-१९ च्या पावत्या पाठविताना सोबत एक यादी देऊन त्यावर शिक्षकांचे मोबाईल नंबर, स्वाक्षरी व पावतीत असलेल्या त्रुटींची नोंद करून, ज्या ज्या शिक्षकांच्या पावत्यांमध्ये त्रुटी आहेत याबाबतची माहिती वित्त विभागाला देण्याचे निर्देश एका पत्राद्वारे सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले होते. परंतु कोणत्याही पंचायत समितीने पावत्यातील त्रुटींची माहिती अद्यापही जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाला सादर केलेली नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांना सुधारित पावत्या अजूनही मिळाल्या नाहीत.त्यामुळे भविष्य निर्वाह निधीतील त्रुटींची दखल घेऊन शिक्षकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे गोपालराव चरडे, रामू गोतमारे, सुनील पेटकर, सुभाष गायधने, धनराज बोडे, वीरेंद्र वाघमारे, आनंद गिरडकर, नीलेश राठोड, लोकेश सूर्यवंशी, पंजाब राठोड, दिलीप जीभकाटे, उज्ज्वल रोकडे, कृष्णा टिकले, मनोज बोरकर, हरिश्चंद्र रेवतकर, गजेंद्र कोल्हे, सी.एस. वाघ, संतोष बुधबावरे, अशोक डोंगरे, महिपाल बनगैया, अनिल पाटील, वसंत बलकी, तुषार चरडे, राम अवचट, राजेश चंदनखेडे आदींनी केली आहे.
शिक्षकांच्या भविष्य निधीत प्रचंड घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:53 AM
शिक्षक संघटनांनी शिक्षकांच्या भविष्य निधीत घोळ असल्याची ओरड केली आहे. ही बाब जि.प.च्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
ठळक मुद्देपावतीवर शून्य जमेची नोंद काहींना मिळाल्याच नाही पावत्या