लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुणावर कधी कशी वेळ येईल, हे सांगता येत नाही. असाच दुर्दैवी प्रसंग बोहरूपी कुटुंबीयावर आला. महिनाभरापूर्वी वर्धा जिल्ह्यातील आष्टीजवळील अपघातात वाडी येथील राजेंद्र बोहरूपी हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबीय हतबल झाले. या कठीणप्रसंगी जाधव कुणबी समाजाचे(जेकेएस) पदाधिकारी मदतीला धावून आले. उपचारादरम्यान आर्थिक मदत केली. राज्यभरातील समाजबांधवांनीही साथ दिली. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. बोहरूपी कुटुंबीयांचे छत्र हिरावले. कमावती व्यक्ती अचानक निघून गेल्याने त्यांची पत्नी सविता राजेंद्र बोहरूपी आणि दोन मुले तेजस्विनी व अंकित यांच्यावर आभाळ कोसळले. दोघांचे शिक्षण अन् कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न सविताला पडला. तेजस्विनी इयत्ता नववीत तर अंकित हा आठवीचा विद्यार्थी. बोहरूपी कुटुंबाची परिस्थिती विचारात घेता, जाधव कुणबी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र कोरडे व पदाधिकारी सतीश सातंगे, मिलिंद साबळे, सुनील शहाणे, विनोद दापूरकर, रिनेश जाने, आदित्य तट्टे, अरविंद जाने ,राजेंद्र काकडे व विलास सोनारे आदींनी मदत करण्याचा संकल्प केला.जाधव समाज कल्याणकारी संस्थेने तेजस्विनी व अंकित यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यापुढेही मदतीची ग्वाही दिली. राजेंद्र बोहरूपी यांच्या तेरवीच्या छोटेखानी कार्यक्रमात जेकेएसची टीम त्यांच्या घरी पोहोचली. दत्तक योजनेचे संकल्पपत्र सविता बोहरूपी यांना हस्तांतरित करून बोहरूपी कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला. मुलांच्या शाळेतील शिक्षकही मदतीसाठी पुढे आले. समाजातर्फे पह्ण्रगती विद्यालयाच्या शिक्षकांचा गौरव केला. निराधार कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणारा निर्णय इतरांना खरोखरच प्रेरणादायी आहे.‘स्मृती निधी’चा नवा संकल्पसमाजाचं काही देणं लागते या भावनेतून आपल्या कुटुंबातील स्वर्गीयांच्या कार्यक्रमावर खर्च न करता याच पैशातून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजातील दुर्बलांना आर्थिक मदत करण्याचा संकल्प समाजबांधवांनी केला आहे. याला प्रतिसाद देत वानाडोंगरी येथील अजय सुखदेवराव देशमुख यांंनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ १५ हजार तर प्रवीण विजयराव गोमकाळे व त्यांचे बंधू प्रशांत यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिनिमित्त २१ हजारांचा धनादेश राजेंद्र कोरडे यांना दिला. हा निधी गरजू व निराधारांसाठी वापरला जाणार आहे.
निराधार कुटुंबाला माणुसकीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 1:40 AM
कुणावर कधी कशी वेळ येईल, हे सांगता येत नाही. असाच दुर्दैवी प्रसंग बोहरूपी कुटुंबीयावर आला. महिनाभरापूर्वी वर्धा जिल्ह्यातील आष्टीजवळील अपघातात वाडी येथील राजेंद्र बोहरूपी हे गंभीर जखमी झाले.
ठळक मुद्देमुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली : उपचारासाठी आर्थिक मदत