शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सव्वादोन महिन्यात दीड कोटी रुपये लंपास

By admin | Published: June 10, 2017 2:34 AM

बँकांच्या तिजोरीचा (लॉकरचा) पीनकोड नंबर माहीत करून घेणे शक्य नाही. मात्र, बँकांच्या तिजोरीतील लाखोंची रोकड कर्जाच्या रूपाने

सहा बँकांना गंडा : ठगबाजांनी अवगत केले बँकांना गंडा घालण्याचे तंत्र नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बँकांच्या तिजोरीचा (लॉकरचा) पीनकोड नंबर माहीत करून घेणे शक्य नाही. मात्र, बँकांच्या तिजोरीतील लाखोंची रोकड कर्जाच्या रूपाने पद्धतशीर लाटण्याचे तंत्र ठगबाजांनी अवगत केले आहे. बनवाबनवीच्या या तंत्रातून राष्ट्रीयकृत बँकांना कोट्यवधींचा गंडा घालण्याचा सपाटाच या ठगबाजांनी लावला आहे. १ एप्रिल २०१७ पासून तो ५ जून २०१७ पर्यंत (अवघ्या नऊ आठवड्यात) उपराजधानीतील सहा बँकांना १ कोटी ५० लाखांचा गंडा घालून ठगबाजांनी बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी, त्याची आर्थिक प्रगती साधण्यासाठी बँकांमार्फत सुलभ दराने कर्ज पुरविण्याची कल्पना प्रत्यक्षात आली. मात्र, या कल्पनेचा लाभ प्रत्येक घटकाला मिळेलच याचा भरवसा नाही. शेतकरी, बेरोजगार, छोटे छोटे व्यावसायिक यांना कर्ज देण्याच्या नावाखाली बँकांचे अधिकारी अक्षरश: वेठीस धरतात. हा कागद आणा, अमूक प्रमाणपत्र आणा, तमूक जामीनदार आणा, असे सांगून खऱ्या अर्थाने ज्यांना कर्जाची गरज आहे, त्यांना विविध बँकांचे अधिकारी हेलपाटे मारायला लावतात. त्यामुळे कर्ज परत करण्याची प्रामाणिक मानसिकता ठेवणारे अनेक कर्जदार बँकांचे उंबरठे झिजवून घामाघूम होतात अन् नंतर नाऊमेद होऊन कर्जाचा नाद सोडतात. अशातील ज्या कुणाला कर्ज दिले जाते, त्याला वेगवेगळी कागदपत्रे मागण्यासोबतच बँक अधिकारी, बँकांचे व्हॅल्युअर अक्षरश: चहुबाजूने बांधून घेतात. त्याचे शेत, घर अथवा अन्य स्थावर मालमत्तेची वारंवार पाहणी करून नंतर कुठे तुटपुंज्या रकमेचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अर्थात प्रचंड मानसिक त्रास सोसल्यानंतर बँक अधिकारी त्या कर्जदाराच्या पदरात आर्थिक प्रवाहाची ओंजळ टाकतात. दुसरीकडे फसवणुकीचा कट रचूनच कर्जाचा प्रस्ताव सादर करणाऱ्यांच्या झोळीत बँका भरभरून माप घालतात. त्यांना लाखोंचे कर्ज बिनबोभाट उपलब्ध करून दिले जाते. अशांना वाहनाच्या नावाखाली, तर कधी व्यवसाय-उद्योगाच्या नावाखाली कर्ज उपलब्ध करून देताना संबंधित बँक अधिकारी त्या ठगबाजांची कागदपत्रे तपासण्याच्या अथवा त्याच्या मालमत्तेची शहानिशा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. रजनीश सिंग नामक ठगबाजाचे एकच उदाहारण त्यासाठी पुरेसे ठरावे. या ठगबाजाने एक, दोन नव्हे तर पाच ते सात बँकांना पाच ते सात कोटींचा गंडा घातला. गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या त्याच्या ठगबाजीला प्रोत्साहन मिळावे, अशी भूमिका बँक अधिकाऱ्यांनी वठविली. एकाच (बंद पडलेल्या) उद्योगाची वेगवेगळ्या बँक अधिकाऱ्यांनी पाहणी करून वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाने लाखोंचे कर्ज उपलब्ध करून दिले. तब्बल पाच ते सात कोटींच्या या कर्जासाठी एकच जमीन वेगवेगळ्या ठिकाणी तारण ठेवण्यात आली. बँक अधिकाऱ्यांनी हे कसे काय मान्य केले, तो स्वतंत्र चौकशीचा विषय ठरला आहे. रजनीशच्या बनवेगिरीकडे बँकांनी डोळेझाक केली मात्र त्याच्या पत्नीनेच त्याची ठगबाजी उजेडात आणून त्याला पोलिसांच्या कोठडीत पोहचवले. रजनीशसारखे अनेक ठगबाज उपराजधानीतील बँकांना पद्धतशीर गंडा घालत आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी विविध बँकांना १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेने गंडविले आहे. १ एप्रिल ते ५ जून या कालावधीत अवघ्या सव्वादोन महिन्यात सहा बँकांना १ कोटी, ५० लाखांपेक्षा जास्त रकमेने गंडविण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फसवेगिरीच्या या सहा प्रकरणापैकी एका प्रकरणातील कर्जाची रक्कम ५१ लाख, दुसऱ्या प्रकरणात ५० लाख ७५ हजार, तिसऱ्या प्रकरणात १८ लाख, चौथ्यात १० लाख, पाचव्यात १६ लाख तर सहाव्या प्रकरणात ४ लाख रुपये आहे. त्यानुषंगाने सीताबर्डी पोलीस ठाण्यात दोन तर, सदर, एमआयडीसी, हिंगणा आणि वाडी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत. तत्पूर्वी, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, इमामवाडा, सदर आणि अन्य काही पोलीस ठाण्यातही बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झालेले आहेत. एकाच भूखंडावर तीन बँकांमधून कर्ज लाखनी (जि. भंडारा) जवळच्या सलोटी येथील रहिवासी श्रीधर रामभाऊ ताकमोडे याने वाठोड्यात भूखंड विकत घेण्यासाठी प्रारंभी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून १५ लाख ७५ हजारांचे कर्ज उचलले. त्यानंतर ताकमोडेने याच भूखंडाचे दुसरे एक विक्रीपत्र इंडियन ओवरसीज बँक, हुडकेश्वर येथे गहाण ठेवून १६ लाख ८० हजारांचे कर्ज घेतले. त्यानंतर तुळशीराम गणपत बारापात्रे (रा. पंचतारा सोसायटी, सोमलवाडा) याने याच भूखंडाची आरोपी ताकमोडेला विक्री केल्याचे दाखवून पंजाब सिंध बँकेतून १९ लाखांचे कर्ज घेतले. घर कुणाचे कर्ज कुणाला घर दुसऱ्याच्याच मालकीचे अन् कर्ज भलत्यानेच लाटले, असा हा प्रकार आहे. धरती श्यामसुंदर लुलेकर यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे आरोपी अजय ऊर्फ सूरज अरुण ठाकरे व त्याची पत्नी सोनी अरुण ठाकरे यांनी त्यांच्या साथीदारांशी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारावर घर खरेदीच्या नावाखाली आयसीआयसीआय बँकेत गृहकर्जाचा प्रस्ताव सादर केला. ५० लाख रुपये कर्ज उचलले. त्यानंतर बनावट कागदपत्रे आणि बनावट व्यक्ती उभ्या करून आरोपी नितीन लुलेकर याच्या नावे घराचे विक्रीपत्र करून घेतले. हे सर्व झाल्यानंतर त्या घरावर उचललेल्या कर्जाची ५० लाखांची रक्कम आरोपींनी आपसात वाटून घेतली. अफलातून बनवाबनवी लकडगंज भागात असलेल्या बँक आॅफ महाराष्ष्ट्रच्या वर्धमाननगर शाखेत फसवणुकीचा अफलातून किस्सा उघड झाला. आरोपी दीपक अशोक डुंबरे(रा. महेशनगर, वाठोडा रिंग रोड, नंदनवन) याने १५ ते १८ जानेवारी २०१७ दरम्यान त्याच्या बँक खात्यात कोणतीही रक्कम शिल्लक नसताना त्याच्या खात्यामधून त्याने ५०१००००९७६१८९१ आणि १४३४०००१०८१९६९३१ या खात्यांमध्ये दोनदा प्रत्येकी एक लाख (एकूण दोन लाख) रुपये वळते केले. तब्बल पाच महिन्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला.