नागपूर : खैरी पुलाजवळील ६०० एमएम व्यासाच्या बस्तरवारी फीडरवर गळती व दुरुस्तीचे काम ओसीडब्ल्यू व महापालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी ८ मे रोजी रात्री ९:३० ते ९ मे रोजी सकाळी ९:३० पर्यंत शटडाऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे या फीडरवरून पाणीपुरवठा होणाऱ्या वस्त्यांमध्ये ९ मे रोजी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्याचा फटका शेकडो वस्त्यांना बसणार आहे.
- या वस्त्यांमध्ये राहणार पाणीपुरवठा खंडितनयापुरा, लोधीपुरा, गोंधपुरा, श्रीराम सोसायटी, पौनीकर सायकल स्टोअर, नागा शिवमंदिर, मातामंदिर, रामदल आखाडा, श्रीवास्तव विहीर, बाहुली विहीर, देवघरपुरा, पहाडपुरा, लालगंज, बस्तरवारी माता मंदिर, तेलघाणी, कुंभारपुरा, राऊत चौक, तेलीपुरा, पेवठा, चकना चौक, छत्तीसगडी राम मंदिर, नाईक तलाव, बांग्लादेश पोलिस चौकी, बैरागीपुरा, तांडापेठ नवीन बस्ती, मोचीपुरा, रामनगर, बारईपुरा, बंगालीपंजा, मुसलमानपुरा, ठक्कर ग्राम, खाटीकपुरा, लाडपुरा, कुंभारपुरा, कुंदनलाल गुप्तानगर, कोलबास्वामीनगर, तिनखडे लेआऊट, वृंदावननगर, मेहेंदीबाग कॉलनी, बिनाकी मंगळवारी, जोशीपुरा, गोसावी घाट, पोळा मैदान, बिनाकी मंगळवारी, भोळेनगर, आनंदनगर, नामदेवनगर, अनुसयामाता नगर आदीं वस्त्यांमधील पाणीपुरवठा बंद राहील.