शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

स्वच्छता अभियानात झाडू मारल्याच्या फोटोची शोधाशोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 10:42 AM

स्वच्छता अभियानात सहभागी काही नगरसेवकांनी हातात झाडू धरला होता. या कार्यक्रमाच्या फोटोची शोधाशोध सुरू असून ते शपथपत्रासोबतच जोडता येईल का, याबाबत वकिलांशी सल्लामसलत सुरू आहे.

ठळक मुद्देशपथपत्रासाठी दोनच दिवस शिल्लक नगरसेवकांना सचिवासोबतच गटनेत्यांनी पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १५१ नगरसेवकांना स्वच्छतेसाठी काय केले अन् काय करू इच्छिता याबाबतचे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शपथपत्र सादर करण्याला आता दोनच दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने नगरसेवकांची धावाधाव सुरु आहे. स्वच्छता अभियानात सहभागी काही नगरसेवकांनी हातात झाडू धरला होता. या कार्यक्रमाच्या फोटोची शोधाशोध सुरू असून ते शपथपत्रासोबतच जोडता येईल का, याबाबत वकिलांशी सल्लामसलत सुरू आहे.न्यायालयाने ५ सप्टेंबरला नगरसेवकांना या आठवड्यात शपथपत्र सादर करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार निगम सचिवांनी १४ सप्टेंबरला नगसेवक ांना पत्र पाठवून न्यायालयात ३ आॅक्टोबरपूर्वी शपथपत्र दाखल करण्याची सूचना केली. सोबतच महापालिकेतील गटनेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना पत्र पाठवून शपथपत्र दाखल करण्याबाबत सूचना केली आहे. त्यानुसार काहींनी वकिलांच्या सल्ल्यानुसार शपथपत्र तयार केले आहे.शहरात मागील काही महिन्यांपासूक डेंग्यू, स्क्रब टायफसचा प्रकोप असल्याने नागरिकांत दशहत आहे. अस्वच्छतेमुळे डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नगरसेवकांची अचानक फार्गिंग मशीनची मागणी वाढली आहे. परंतु आरोग्य विभागाकडे चारच फॉगिंग मशीन आहेत. अचानक फागिंग मशीनची मागणी वाढल्याने आरोग्य विभागापुढे धर्मसंकट उभे ठाकले आहे. मोठी फॉगिंग मशीन उपलब्ध नसेल तर किमान फागिंगची हॅन्ड मशीन उपलब्ध करा, अशी मागणी केली जात आहे. किमान यासंदर्भात झोन कार्यालयाकडे मागणी नोंदविली होती. याची माहिती शपथपत्रात देता येईल. हाही यामागील हेतू आहे.प्रभागातील स्वच्छतेबाबतच्या समस्या सुटावी यासाठी नागरिकांनी नगरसेवकांना निवडून दिले. परंतु निवडून काही अपवाद वगळता बहुसंख्य नगरसेवकांनी सभागृहात आपल्या प्रभागातील स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केलेला नाही. निवडणुकीनंतर अनेकांचे अजूनही प्रभागातील नागरिकांना दर्शन झालेले नाही. असे नगरसेवक शपथपत्रात कोणती माहिती देतात याची नागरिकांना उत्सुकता आहे.

झोनकडे तक्रारी करूनही दखल नाहीप्रभाग ३० मध्ये कचऱ्याची व दूषित पाण्याची समस्या आहे. यासंदर्भात नेहरुनगर झोन कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु त्याची दखल घेतली जात नाही. वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांना शपथपत्रात स्वच्छतेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती द्यावयाची आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आता तरी झोनचे अधिकारी याकडे लक्ष देतील. अशी माहिती नगरसेवक संजय महाकाळकर यांनी दिली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान