एकूण लसीकरण - १०,७१, ६३१
पहिला डोस - ७,४९,९९३
दुसरा डोस - ३,२१,६३८
एकूण लसीकरण केंद्रे -१०८
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आता बऱ्यापैकी निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे लसीकरणालाही गती मिळाली आहे. परंतु अनेकजण लस घेतली की लगेच केंद्राबाहेर निघून जातात. तुम्हीही असे करत असाल तर थांबा कारण असे करणे धोक्याचे ठरू शकते.
लस घेतली की किमान अर्धा तास केंद्रातच थांबा असे सरकार व प्रशासनाने वारंवार जाहीर केले आहे. त्यामागे कारण आहे. लस घेतल्यावर काही जणांना रिॲक्शन होण्याची भीती असते. अशावेळी संबंधित व्यक्ती केंद्रात राहिली तर केंद्रातील डॉक्टर, परिचारिका लगेच धावपळ करून त्याच्यावर उपचार करू शकतील. परंतु लस घेतल्यानंतर व्यक्ती लगेच निघून गेला आणि त्याला रस्त्यात पुरळ आली, रिॲक्शन झाले तर तातडीने उपचार मिळू शकणार नाही. परिणामी प्रकृती बिघडून जीवाचे बरे वाईट होण्याची भीती असते.
त्यामुळेच लस घेतल्यानंतर व्यक्तीला किमान अर्धा तास केंद्रात राहण्यास सांगितले जाते. तेव्हा संबंधितांनी याची काळजी घ्यावी.
बॉक्स
लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?
लसीकरणानंतर अर्धा तास ठेवण्याच्या मागचे कारण म्हणजे कुणाला चक्कर येऊ शकते. कुणाला रिॲक्शन होऊ शकते. कुणाला पुरळ येऊ शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवावे लागते.
बॉक्स
अजूनपर्यंत कुणालाही साईड इफेक्ट झाल्याचे आढळले नाही
- नियमानुसार लस घेतल्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. कारण लसीचे कुणावर साईड इफेक्ट होतात, त्यामुळे आम्ही त्यांना अर्धा तास ऑब्झरव्हेशनमध्ये ठेवतो. पण अजूनपर्यंत जिल्ह्यात लस घेतल्याने त्याचे साईड इफेक्ट झाल्याचे आढळले नाही.
डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी,