लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नानंतर हुंड्यासाठी छळ करून दोन लाख रुपये हडपणाऱ्या पतीने अनैसर्गिक बलात्कार केल्याची तसेच त्याच्या नातेवाईकांनीही त्रास दिल्याची तक्रार एका विवाहितेने तहसील ठाण्यात नोंदवली. प्रकरण फेब्रुवारी ते ऑगस्ट २०१२ चे असून, सात वर्षांनंतर या प्रकरणाची तक्रार झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी रितीन अमृतलाल शाहू याने लग्नानंतर त्याच्या पत्नीचा छळ सुरू केला. २५ फेब्रुवारी २०१२ च्या मध्यरात्रीपासूनच त्याने तिला माहेरून सोने आणि पैसे आणावे म्हणून त्रास देणे सुरू केले. एवढेच नव्हे तर आरोपी पती तिच्यासोबत अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित करीत होता. त्यासाठी तो तिला मारहाणही करायचा. ऑगस्ट २०१२ पर्यंत तिने माहेरून आरोपी पती रितीन तसेच त्याचे नातेवाईक सावित्रीबाई अमृतलाल शाहू, प्रीती राजेश शाहू, सोनू अमृतलाल शाहू आणि अमृतलाल शाहू त्रास देत असल्याने तक्रार करणाऱ्या विवाहितेने त्यांना आपल्या माहेरून दोन लाख रुपये आणून दिले. मात्र, त्यांचा तगादा सुरूच होता. त्यामुळे महिलेने त्यांना रक्कम आणि सोने आणून देण्यास नकार दिल्याने आरोपी पतीने तिला घराबाहेर काढून दिले. विवाहितेच्या या तक्रारीनुसार, तहसील पोलिसांनी अनैसर्गिक शरीरंसंबंध जोडण्याच्या (बलात्कार) आरोपाखाली कलम ३७७ तसेच हुंड्यासाठी करण्यात आलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपावरून कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.सलूनवाल्याचा चिमुकलीवर बलात्कारपाच वर्षीय चिमुकलीवर एका सलूनचालकाने बलात्कार केला. सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर पाचपावली परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. पीडित मुलगी पाच वर्षांची आहे. ती सोमवारी सकाळी आपल्या वडिलांसोबत खेळता खेळता गजानन सलूनचा संचालक आरोपी माली बाबा ऊर्फ भगवान श्रीकृष्ण जामगडे (वय ५५) याच्या दुकानात गेली. दुकानात कुणी नसल्याची संधी साधून आरोपी मालीबाबाने चिमुकलीवर अत्याचार केला. रात्री मुलीची आई कामावरून घरी परतल्यानंतर तिला चिमुकलीने वेदना होत असल्याचे सांगितले. त्यानंतर या संतापजनक प्रकरणाचा उलगडा झाला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी मालीबाबाला अटक केली.
पतीवर बलात्काराचा आरोप : हुंड्यासाठी छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:40 AM
लग्नानंतर हुंड्यासाठी छळ करून दोन लाख रुपये हडपणाऱ्या पतीने अनैसर्गिक बलात्कार केल्याची तसेच त्याच्या नातेवाईकांनीही त्रास दिल्याची तक्रार एका विवाहितेने तहसील ठाण्यात नोंदवली.
ठळक मुद्देअनैसर्गिक अत्याचार, तहसीलमध्ये गुन्हा दाखल