पतीला १० वर्षे सश्रम कारावास  : हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:44 AM2019-10-11T00:44:48+5:302019-10-11T00:46:18+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली.

Husband sentenced to 10 years imprisonment: High Court decision | पतीला १० वर्षे सश्रम कारावास  : हायकोर्टाचा निर्णय

पतीला १० वर्षे सश्रम कारावास  : हायकोर्टाचा निर्णय

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालयाच्या आदेशात बदल

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. ही घटना सक्करदरा पोलिसांच्या हद्दीतील आहे.
शंकर पांडुरंग निखारे (४५) असे आरोपीचे नाव असून, तो भांडेप्लॉट झोपडपट्टी येथील रहिवासी आहे. मयताचे नाव अनसूया होते. तिने २००७ मध्ये आरोपीसोबत दुसरे लग्न केले होते. ५ मे २००८ रोजी सकाळी ६ च्या सुमारास आरोपीने अनसूयाला चहा करायला सांगितले. दरम्यान, आरोपीने अनसूयासोबत भांडण उकरून काढले व तिला अश्लील शिवीगाळ केली तसेच तिच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली. त्यामुळे अनसूया गंभीररीत्या जळून मरण पावली. सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२(खून)अंतर्गत जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता, सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला व आरोपीला भादंविच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-१(सदोष मनुष्यवध)अंतर्गत दोषी ठरविले आणि त्याला वरीलप्रमाणे सुधारित शिक्षा सुनावली.

Web Title: Husband sentenced to 10 years imprisonment: High Court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.