शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अनैतिक संबंधातून पतीचा खून

By admin | Published: October 20, 2016 3:20 AM

मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी शिवारात खून करून मृतदेह फेकून देण्यात आला होता.

तिघांना अटक : माथनीतील प्रकरणाचा उलगडा, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईनागपूर : मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी शिवारात खून करून मृतदेह फेकून देण्यात आला होता. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह अन्य दोन साथीदारांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वातील पथकाने बेवारस स्थितीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना अटक करण्याची कामगिरी अवघ्या १२ दिवसांत केली, हे विशेष!मो. लालू ऊर्फ लाल मो. दुखामिया सैयद (४३, रा. बडकी छपरा, जि. बैसाली, ह.मु. हरीहरनगर, कन्हान) असे मृताचे नाव आहे. तो पत्नी गुड्डी ऊर्फ परवीनसोबत कन्हान येथे राहात होता. दरम्यान, ६ आॅक्टोबरला माथनी शिवारातील नाल्याजवळ कुजलेल्या, अ‍ॅसिडने चेहरा जाळलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. मात्र त्याची ओळख पटलेली नव्हती. घटनास्थळाची पाहणी आणि पंचनामा केल्यानंतर मौदा पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. चेहरा जाळलेला आणि मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने प्रथम ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. मौदा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आणि कोणताही सुगावा लागत नसल्याने पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन बारीकसारीक पुरावे गोळा करीत तपासाला गती दिली. मृताची ओळख पटविण्यासाठी केवळ अंगात असलेले कपडे तेवढा एक आधार होता. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेने खबऱ्यांना‘अ‍ॅक्टिव्ह’ करीत ठिकठिकाणी शोधमोहीम राबविली.त्यातच मंगळवारी (दि. १८) कन्हान येथील खबऱ्यांकडून लालू हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्याला तक्रार न देता त्याची पत्नी ही दुसऱ्या व्यक्तीसोबत राहात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आल्याने तिला तिच्या पतीबाबत विचारपूस केली. मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. परिणामी पोलिसांचा संशय बळावला. प्रियकराच्या मदतीने तिने काटा काढला असावा, असाही पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. मृताच्या अंगावर आढळलेल्या कपड्यांचे छायाचित्र कन्हान येथील नागरिकांना दाखविताच मृत हा लालू असल्याचे स्पष्ट झाले. (जिल्हा प्रतिनिधी)प्रियकराच्या मदतीने काढला काटाकांद्री कन्हान येथे राहात असलेल्या लालूच्या पत्नीचे मो. तनबिर मो. रफिक पिंजारी (३०, रा. बिरडावन टोला, ता. पनापूर, जि. मुजफ्फरपूर) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यातूनच अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या लालूचा ‘गेम’ करण्याची योजना आरोपींनी आखली. यानुसार मृताची पत्नी, तिचा प्रियकर मो. तनबिर मो. रफिक पिंजारी आणि तनबिरचा मित्र मो. तोहीद मो. मसीर मान्सुरी (३२, रा. मुस्लिम टोला, जि. बैसाली, बिहार) यांनी ३ आॅक्टोबर रोजी लालूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकून चेहरा विद्रुप करून मृतदेह मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी शिवारात फेकून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारीक-सारीक बाबी तपासत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करून मौदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सहायक पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस हवालदार शैलेश शुक्ला, नायक पोलीस शिपाई मंगेश डांगे, पोलीस शिपाई प्रणय बनाफर, विशाल चव्हाण, चालक सहायक फौजदार साहेबराव बहाडे, महिला पोलीस शिपाई दुर्गा कागदे मेश्राम, नम्रता बघेल, कीर्ती हरडे यांनी पार पाडली. त्यांना जिल्ह्यातील पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.