शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मी ठाणेदार शारदा झांबरे...

By admin | Published: March 09, 2016 3:16 AM

जय हिंद ... अंबाझरी पोलीस स्टेशन... मी पोलीस उपनिरीक्षक शारदा झांबरे बोलते... कोण बोलता..., हं... कुठे... अच्छा...थांबा... येतेच मी !

उपराजधानीत महिला पोलीस अधिकाऱ्यांचा अंमल : गुन्हेगारीवर नजरनागपूर : जय हिंद ... अंबाझरी पोलीस स्टेशन... मी पोलीस उपनिरीक्षक शारदा झांबरे बोलते... कोण बोलता..., हं... कुठे... अच्छा...थांबा... येतेच मी ! फोन ठेवताच, चला हो... काढा गाडी ... तिकडे काही तरी गडबड आहे...! पोलिसांचे वाहन निघते. घटनास्थळी पोहचते. संबंधितांना विचारपूस होते. त्यांना तसेच त्यांच्या माहितीवरून आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले जाते. प्राथमिक चौकशी केल्यानंतर थोडी ठोकपीट होते. नंतर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली जाते. उपराजधानीतील २४ ही पोलीस ठाण्यात आज असेच मिळतेजुळते चित्र होते.अंबाझरी ठाणे : शारदा झांबरे दैनंदिन तक्रारी हातावेगळ्या करतानाच त्यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाची आज सुरक्ष व्यवस्था सांभाळली. पोलीस ठाण्यात आलेल्यांना योग्य सल्ला देत त्यांनी गोकुळपेठेत पोलीस मित्रांच्या बैठकीतही सहभाग नोंदवला. या शिवाय ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भागात आयोजित कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या. आत्मविश्वासात वाढपोलीस ठाणे म्हटले की, गडबड गोंधळ, ठोक-पीट, टाळाटाळ, शिवीगाळ अन् आरडाओरड असे गरमागरम वातावरण असते. मात्र, आज शहरातील २४ ही ठाण्यातील वातावरणात थोडीशी अदब बघायला मिळत होती. धावपळ होतीच. थोडीफार आरडाओरड असली तरी टाळाटाळ दिसत नव्हती. शिवीगाळही कमीच ऐकू येत होती. विशेषत: महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह दुणावल्यासारखा जाणवत होता. आपल्याकडे विशेष जबाबदारी असल्याच्या जाणिवेमुळे त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढल्याचे जाणवत होते. पोलीस ठाणे निहाय पदभार असा सोनेगाव - दीपाली राऊत, सीताबर्डी - विशाखा वाघाडे, धंतोली - नम्रता जाधव, अंबाझरी - शारदा झांबरे, प्रतापनगर पी. डी. गोदमले, एमआयडीसी - रामटेके, अजनी - संध्या चव्हाण, लकडगंज - वानखेडे, नंदनवन - प्रीती कुळमेथे, कोतवाली - हवालदार संगीता यादव, सदर - सारिका बागडे, मानकापूर - श्रीखंडे, जरीपटका - सोनवणे, तहसील - वृशाली वडस्कर, गणेशपेठ सुलभा राऊत, यशोधरानगर - रिता मेश्राम, इमामवाडा - मीना उमाळे, अजनी - छाया एडकेवार, हुडकेश्वर - कविता कोंकणे, पाचपावली - ए. पी. बावनकर, कळमना- छाया गुजर