कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यभर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. या माध्यमातून इंदिराजींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचविणे व कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. असे असताना नागपूरसह विदर्भात मात्र सर्व काही सामसूम आहे. आपला ‘गट’ मजबूत करण्यासाठी जीवाची ‘बाजी’ लावण्यात व्यस्त असलेल्या नेत्यांना इंदिराजींसाठी एकत्र येण्यास वेळ नाही. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात पुन्हा काँग्रेसचा पाया कसा भक्कम होईल, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून नेत्यांना केला जात आहे.काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षाचा पहिला कार्यक्रम नुकताच औरंगाबाद येथे पार पडला. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या उपस्थितीत झालेला सोहळ्याची राज्यभर चर्चा झाली. स्थानिक नेत्यांनी त्यात पुढाकार घेत एक चांगला संदेश दिला. २७ आॅगस्ट रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकारातून सोलापूर येथे कार्यक्रम होत आहे. पण काँग्रेसला खरी ताकद देणाºया विदर्भातील नेत्यांनी मात्र नागपुरात असा कार्यक्रम आखण्यासाठी अद्याप पुढाकार घेतलेला नाही. यासाठी स्थानिक नेत्यांची अद्याप एकही संयुक्त बैठकही झालेली नाही.विदर्भाने वेळोवेळी काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यासाठी सहकार्य केले आहे. आणीबाणीच्या काळातही विदर्भाने काँग्रेसला साथ दिली. सत्ता गेल्यानंतर इंदिरा गांधी विदर्भ दौºयावर आल्या असता जनता सरकारतर्फे त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले जात होते. मात्र, तशाही परिस्थितीत विदर्भाने त्यांना साथ दिली. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. आणीबाणीनंतर काँग्रेस कमजोर झाली असताना १९७७ च्या निवडणुकीत विदर्भातून नऊ खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. हीच किमया विदर्भाने ११९८ च्या निवडणुकीत करून दाखविली. मात्र, सद्यस्थितीत विदर्भात काँग्रेसचा एकही खासदार नाही. आमदारांची संख्या बोटावर मोजण्याइतकी झाली आहे. नेत्यांमधील गटबाजीमुळे कार्यकर्ते कमालीचे व्यथित झाले आहेत. अशा परिस्थितीत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रम राबवून मगरळ आलेल्या पक्ष संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची चांगली संधी आहे. मात्र, या संधीचे सोने करण्यासाठी विदर्भातील एकही नेता पुढाकार घेताना दिसत नाही.नागपुरात गटबाजीचा पूरमाजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार सात वेळा लोकसभेत पोहचले. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनीही विधानसभेच्या पाच निवडणुका लढविल्या. नितीन राऊत, अनिस अहमद, राजेंद्र मुळक यांनीही मंत्रिपदे उपभोगली. शहर अध्यक्ष म्हणून विकास ठाकरे खुर्ची सांभाळून आहेत. ही सर्व नेते मंडळी नागपुरात असताना येथे इंदिराजींच्या जन्मशताब्दी सोहळ्यासाठी कुठलेही नियोजन दिसत नाही. नेते गटबाजीतच व्यस्त आहे. माजी मंत्री व अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक तसेच नवनियुक्त महासचिव अविनाश पांडे हे दिल्लीत नागपूरचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, आपल्या शहरातून इंदिराजींचा नारा बुलंद व्हावा, यासाठी हे नेतेही पुढाकार घेताना दिसत नाही. त्यासाठी स्थानिक नेत्यांना दिशानिर्देश देताना दिसत नाहीत. ते दिल्लीच्या नियोजनातच व्यस्त आहेत.नागपुरातही कार्यक्रम होईलइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील प्रमुख शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. नागपुरातही विदर्भस्तरीय कार्यक्रम होईल. स्थानिक नेत्यांशी चर्चा करून व दिल्लीतील नेत्यांची वेळ घेऊन तारीख निश्चित केली जाईल. त्यासाठी समितीचे नियोजन सुरू आहे.- माणिक जगताप,समन्वयक, इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष राज्यस्तरीय समिती
गटबाजीत व्यस्त काँग्रेस नेत्यांना इंदिराजींचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:19 AM
प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यभर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. या माध्यमातून इंदिराजींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचविणे व कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
ठळक मुद्देजन्मशताब्दी वर्षासाठी पुढाकार नाही : बालेकिल्ला कसा होणार मजबूत ?