शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

अमित शहांना भेटलोच नाही, १६ आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडत नाही - अजित पवार 

By कमलेश वानखेडे | Published: April 16, 2023 5:40 PM

अजित पवार हे भाजपसोबत जावून सत्ता स्थापन करतील, अशा चर्चा उठल्या असताना अजित पवार यांनी मात्र, अशी कुठलीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले.

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जावून सत्ता स्थापन करतील, अशा चर्चा उठल्या असताना अजित पवार यांनी मात्र, अशी कुठलीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी मुंबईत आले असता आपली त्यांच्याशी भेट झालीच नाही. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयााने १६ आमदारांना अपात्र ठरविले तरी आकड्यांचे गणित पाहता सरकार पडत नाही. त्यामुळे ढगात गोळ्या मारण्यात अर्थ नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

वज्रमुठ सभेसाठी रविवारी सकाळी अजित पवार हे नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेटीबाबत विचारणा केली असता भेट कुठे झाली, केव्हा झाली, अशी उलट विचारणा त्यांनी केली. मी कालच येणार होतो. पणसभा रविवारी सायंकाळी असल्यामुळे मी सकाळी पोहचण्याचा निर्णय घेतला. रात्री मुंबईला गेलो नव्हतो. मी पुण्यातच ‘जिजाई’ या माझ्या घरीच होतो.

या सगळ्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. त्यात काह तत्थ्य नाही. कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचे काम इतरांनी व मिडियानेही करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. वर्भषरापासून सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्हाचा निकाल दिला. सर्व वकिलांनी आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. सगळा महाराष्ट्र या निकालाकडे लक्ष ठेवून आहे. 

अजितदादांनी मांडल बहुमताचे गणितअजित पवार म्हणाले, भाजपकडे स्वत:चे १०९ व अपक्ष ६ सहा असे एकूण ११५ आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आहेत. हे एकूण १५५ होतात. पुन्हा बच्चू कडू, रवी राणा असे एकूण १० सोबत आहे. हे सर्व १६५ होतात. १६ अपात्र झाले तरीदेखील आकडा १४९ राहतो. मॅजिक फिगर १४५ ची आहे. कारण नसताना वावड्या उठविण्याचे काम सुरू आहे. २८८ मधून १६ कमी झाले तरी एकूण २७२ आमदार उरतात. त्यावेळी बहुमतासाठी १३७ लागतील. 

त्यामुळे भाजपला काही फरक पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कुणाबद्दल गैरसमज पसरविण्याचे काहीच कारण नाही, असे गणितही पवार यांनी मांडले. मी मटक्यांचे आकडे थोडीच मांडतो आहे. विधानसभेतील आमदारांचे आकडे मांडत आहे. एवढ्या वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे उगाच ढगात गोळ्या मारण्यात काहीच अर्थ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :nagpurनागपूरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmit Shahअमित शाह