नागपूर : आयकॅडच्या १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नीट-रँक बुस्टर प्रोग्रामकरिता (टेस्ट सिरीज) नोंदणी सुरू आहे. नीटी-यूजी २०२१ करिता आयकॅडचा रँक बुस्टर प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम आधुनिक एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) परीक्षा पॅटर्नवर डिझाईन केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नीट पेपर पॅटर्नची माहिती मिळेल आणि त्यांना वास्तविक परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न येतात, हे कळून येईल. आयकॅड स्कूल ऑफ लर्निंग वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी मध्य भारतातील अग्रणी प्रशिक्षण संस्था आहे. विदर्भ विभागातून नीट व जेईईमध्ये वर्षानुवर्षे विश्वसनीयरित्या अव्वल स्थान मिळवित आहे. नीट-यूजी २०१७, २०१८ आणि २०१९ च्या बॅचमधून अप्रतिम निकाल लागल्यानंतर आरबीटी आणि नियमित क्लासरूम प्रोग्राम अंतर्गत नीट-यूजी २०२० मध्ये २९ विद्यार्थ्यांना ६०० पेक्षा जास्त गुण आणि ६९ विद्यार्थ्यांना ५५० पेक्षा जास्त गुण मिळविले होते. आता पुन्हा २०२१ मध्ये आयकॅड मेडिकल विदर्भातून सर्वोत्तम निकाल देण्यासाठी तयार आहे. नीट-यूजी २०२१ चा आयकॅड रँक बुस्टर प्रोग्राम (टेस्ट सिरीज) १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. सुरुवातीला पाच टॉपिक टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यानंतर ७२० गुणांच्या तीन तासांच्या ३० पूर्ण लांबीची नीट टेस्ट राहणार आहे. नंतर शंका निरसन सत्र राहील. चौकशी व प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक आयकॅडचे मुख्य कार्यालय आणि ट्रेनिंग सेंटर, २१, बास्केटबॉल मैदानासमोर, लॉ कॉलेज चौकाजवळ, टिळकनगर येथे संपर्क साधू शकतात. (वा.प्र.)
आयकॅड नीट-रँक बुस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:08 AM