कट रचूनच युगची हत्यानागपूर : घटनाक्रम लक्षात घेता आरोपींनी युगचे अपहरण व हत्येचा अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता हे सिद्ध होते, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला आहे. शासनातर्फे उच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकील अॅड. ज्योती वजानी, युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्यातर्फे अॅड. राजेंद्र डागा तर, आरोपींतर्फे अॅड. मिर नगमान अली व अॅड. चेतन ठाकूर यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)काय म्हणाले हायकोर्टहायकोर्टाने आरोपींना फाशीची शिक्षा देताना अत्यंत मार्मिक शब्दांत भावना व्यक्त केल्या. हायकोर्ट म्हणाले, एका निरागस मुलाचे जीवन उमलण्यापूर्वीच हिरावून घेणाऱ्या आरोपींबाबत दया दाखविण्याची अपेक्षा समाज आमच्याकडून करेल अशी ही घटना आहे काय? रात्रभरात श्रीमंत होण्याच्या हव्यासाने एका अल्पवयीन मुलाचा व त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा छळ करणाऱ्या आरोपींना केवळ साधी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी अपेक्षा समाज आमच्याकडून करेल काय? ही घटना घडल्यानंतर संपूर्ण प्रदेशातील समाजमनाला जोरदार धक्का बसला हे सर्वांनाच माहीत आहे. या घटनेमुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आई मुलांना शाळेत पाठविण्यास घाबरत होत्या. मुलाला शाळेत पाठविल्यानंतर तो घरी परत येईल की नाही अशी भीती त्यांना वाटत होती. या घटनेनंतर संपूर्ण समाजाने आंदोलने केली होती. कॅन्डल मार्च काढले होते. काय समाजाचा अंतरात्मा न्यायालयाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावे, अशी अपेक्षा करेल? आम्हाला असे वाटते की, अशा निर्घृण घटनेतील आरोपींना समाज कधीच क्षमा करणार नाही आणि त्यांना कठोरतेने हाताळले जावे अशीच एकूण समाजाची अपेक्षा आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे समजून आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी हीच याप्रकरणात समाजाची मागणी असल्याचे गृहित धरण्यात आम्हाला काहीच संकोच वाटत नाही.
थंड डोक्याने कट रचला होता
By admin | Published: May 06, 2016 2:55 AM