नागपूर : आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील प्रभू श्रीरामासारखे लोक समाजात दिसून येत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले.दत्तोपंत ठेंगडी यांनी सामाजिक समरसतेचे स्वप्न दिले. त्यांनी दिलेले विचार आजदेखील तितकेच शाश्वत आहेत, असे भागवत म्हणाले.‘टीम वर्क’ करत असताना नेतृत्व करणाऱ्यांनी सर्वांसोबत एकत्रितपणे राहून काम केले पाहिजे. विशेष म्हणजे इतरांना उपदेश देताना अगोदर तो कृतीत आणण्याची आवश्यकता असते, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.>मातृशक्तीशिवाय संघटना अपूर्ण - महाजनलोकसभेच्या माजी अध्यक्षा व दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारोह समितीच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन म्हणाल्या, रामजन्मभूमीच्या एकूण लढ्यात महिलांचा मौलिक सहभाग होता. मातृशक्तीशिवाय कुठलीही संघटना अपूर्ण आहे.
''प्रभू श्रीरामासारखा आदर्श आजही दिसत नाही''
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 5:30 AM