लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवाच्या गरजेतून व पुढे कुतूहलातून विज्ञानाची निर्मिती झाली. लाखो वर्षापूर्वी गुहेत राहणारा माणूस आपल्या आवश्यकतेनुसार गोष्टी करीत गेला व त्यातून विज्ञान उलगडत गेले. या कुतूहलाने मानवाला अंतराळात सॅटेलाईट वापरापर्यंत नेले आहे. पुढे संस्थागत रुपातून समाजोपयोगी संशोधनाला चालना मिळाली. या सर्व बदलांची आणि शासकीय संस्थांद्वारे चालणाऱ्या लोकोपयोगी संशोधन व विकासकार्याची ओळख करून देणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन रमण विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले.बुधवारी या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे केंद्रीय स्तरावर भूविज्ञानापासून अंतराळात संशोधन करणाऱ्या संस्थांच्या संशोधन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न यामध्ये केला गेला आहे. मुलांना आकाशात फिरणारे विमान, रॉकेटचे कुतूहल असते त्यानुसार प्रदर्शनातील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चा स्टॉल मुलांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. आकाशातून खोल समुद्राचे रहस्य सांगणारा भारतीय बनावटीचा ‘ओसीन सॅटेलाईट-१’ तसेच सॅटेलाईट अंतराळात सोडणाऱ्या जीएसएलव्ही, पीएसएलव्ही या लॉन्चरची प्रतिकृती विद्यार्थी कुतूहलाने न्याहाळताना दिसतात. इस्रोच्या कार्याची माहिती देणाऱ्या इतरही गोष्टी विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाकडे प्रवृत्त करणाऱ्या ठरत आहेत. इस्रोला लागून असलेला भारतीय मानवविज्ञान सर्व्हेक्षण संस्थेचा स्टॉल मुलांचे कुतूहल वाढविणारा आहे. गुहेत राहत असतानापासून हजारो, लाखो वर्षात मानवामध्ये झालेले शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक आणि शेतीविषयक बदलाची माहिती या स्टॉलच्या माध्यमातून मिळत आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून याची माहिती होत असते, मात्र संस्थेद्वारे या दृष्टीने प्रत्यक्ष चालणाऱ्या
नागपुरात आदिमानवाची उत्क्रांती ते सॅटेलाईट तंत्राची मुलांना ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:06 AM
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवाच्या गरजेतून व पुढे कुतूहलातून विज्ञानाची निर्मिती झाली. लाखो वर्षापूर्वी गुहेत राहणारा माणूस आपल्या आवश्यकतेनुसार गोष्टी करीत गेला व त्यातून विज्ञान उलगडत गेले. या कुतूहलाने मानवाला अंतराळात सॅटेलाईट वापरापर्यंत नेले आहे. पुढे संस्थागत रुपातून समाजोपयोगी संशोधनाला चालना मिळाली. या सर्व बदलांची आणि शासकीय संस्थांद्वारे चालणाऱ्या लोकोपयोगी ...
ठळक मुद्देरमण विज्ञान केंद्रात विज्ञान प्रदर्शन सुरू : केंद्रीय संशोधन संस्थांचा सहभाग