साेशल मीडियावर जयभीमचा प्रवाह
दरम्यान, साेशल मीडियावर दाेन दिवसांपासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा प्रवाह ओसंडून वाहत हाेता. अनुयायांनी बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या छवींचे छायाचित्र, त्यांचे कार्य शब्दरूपात मांडत आपल्या अभिमानास्पद भावना व्यक्त केल्या. दिवसभर जयंतीचा शुभेच्छा वर्षाव चालला हाेता.
अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद
संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्यावतीने संविधान चाैक येथे अभिवादन करण्यात आले. परिषदेचे नागपूर शहर व जिल्हा अध्यक्ष दिलीप नरवडिया यांच्या अध्यक्षतेत माेजक्या पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला मालार्पण करून नमन केले. याप्रसंगी रवी गाडगे पाटील, राजू आस्वले, करुणा आतराम, मनाेज माहेश्वरी, रिजवान अंसारी, गणेश आतराम आदी उपस्थित हाेते.
नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी
भारतीय घटेनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने संविधान चाैक येथे अभिवादन करण्यात आले. शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, आ. ॲड. अभिजीत वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियमांचे पालन करीत कार्यकर्त्यांनी महामानवाला नमन केले. याशिवाय एकत्रित येण्यापेक्षा सर्व ६ विधानसभानिहाय ब्लाॅक अध्यक्षांनी त्यांच्या ब्लाॅकमध्ये बाबासाहेबांना मानवंदना दिल्याची माहिती प्रधान महासचिव डाॅ. गजराज हटेवार यांनी दिली.
खलाशीलाईन क्रीडा प्रबाेधिनी
महामानव डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने खलाशी लाईन क्रीडा प्रबोधिनी मोहननगरतर्फे अभिवादन करण्यात आले. बुद्धवंदना घेण्यात आली. याप्रसंगी उपाध्यक्ष चंद्रकांत वासनिक, जितू नंदेश्वर, सुहास इंदूरकर, लवेश कोचे, दिलीप लव्हात्रे, विजय सावरकर यांची उपस्थिती होती.