लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील १८ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबतची फाईल मंत्रालय, महापालिका प्रशासनात अनेदा फिरली. परंतु कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. यामुळे हतबल झालेल्या बडतर्फ कर्मचाऱ्यांपैकी सात जणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री व महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांना शुक्रवारी पत्र पाठविले आहे.१२ एप्रिल २०१८ रोजी बडतर्फ कर्मचाऱ्यांपैकी काही जणांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासापुढे रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिकेला बडतर्फ कर्मचाऱ्यांसंदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात पत्र पाठविले. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आयुक्तांनी हा प्रस्ताव नाकारून शासनाकडे पाठविला होता. नगरविकास विभागाने हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
सेवेत घेतले नाही तर आत्महत्या करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:28 AM
महापालिकेतील १८ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबतची फाईल मंत्रालय, महापालिका प्रशासनात अनेदा फिरली. परंतु कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. यामुळे हतबल झालेल्या बडतर्फ कर्मचाºयांपैकी सात जणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री व महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांना शुक्रवारी पत्र पाठविले आहे.
ठळक मुद्देनागपूर मनपातील बडतर्फ कर्मचाऱ्यांचा इशारा : मुख्यमंत्री, आयुक्तांना लिहिले पत्र