शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नाही तर डेंग्यूचा प्रकोप! घराघरांत डेंग्यूच्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:02 PM

डेंग्यूमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद झाली होती. तब्बल ६०१ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी एकट्या आॅगस्ट महिन्यात शहरात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने नुकत्याच केलेल्या तपासणीत ७०० वर घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. यामुळे प्रशासनानेच नव्हे तर नागरिकांनी तातडीने उपाययोजना न केल्यास डेंग्यूचा प्रकोप होण्याची भीती वर्तविली जात आहे.

ठळक मुद्दे२६ दिवसांत ५१ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद झाली होती. तब्बल ६०१ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी एकट्या आॅगस्ट महिन्यात शहरात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने नुकत्याच केलेल्या तपासणीत ७०० वर घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. यामुळे प्रशासनानेच नव्हे तर नागरिकांनी तातडीने उपाययोजना न केल्यास डेंग्यूचा प्रकोप होण्याची भीती वर्तविली जात आहे.डेंग्यूवर स्पष्ट उपचार नाही. अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषधही नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. यामुळे हिवताप व हत्तीरोग विभाग डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उन्हाळ्यापासूनच घराघरांची झाडाझडती घेणे सुरू करते. विभागाच्या चमूने जुलै महिन्यापर्यंत २७ हजार २८८ घरांची तपासणी केली. यात १२ हजार घरांत डेंग्यूचे डास व अळ्या आढळून आल्या. या तपासणीत दूषित घर व परिसरांमध्ये कीटकनाशक फवारणी केली. परंतु आॅगस्ट महिन्यात ज्या घरांमध्ये डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले त्या घरांची तपासणी केली असता शेकडोवर वस्त्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. यातच आॅगस्ट महिन्यात आतापर्यंत ५१ रुग्णांची नोंद झाल्याने हा विभाग हादरून गेला आहे.३१ बालकांना डेंग्यूजानेवारी ते आतापर्यंत डेंग्यूचे ७३ रुग्ण आढळून आले. यात १ ते १४ वर्षापर्यंतच्या वयोगटात २० मुले व ११ मुली अशा ३१ बालकांची नोंद आहे. १५ ते २४ वयोगटात १६ युवक व ८ युवतींना तर २५ ते ६० या वयोगटात १३ पुरुष व ५ महिलांना डेंग्यूचे निदान झाले आहे. बालकांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.संशयित रुग्ण आढळल्यास फोन कराआॅगस्ट महिन्यामध्ये केलेल्या तपासणीत घराघरांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत, शिवाय ५१ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे लोकांनी आता पुढाकार घेत घरातील डासांच्या उत्पत्तीचे केंद्र नष्ट करणे आवश्यक झाले आहे. सोबतच घरात किंवा शेजाऱ्यांकडे डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आल्यास हिवताप व हत्तीरोग विभागाच्या ०७१२-२७३९०१७ या दूरध्वनीवर माहिती देऊन पत्ता सांगावा. यामुळे विभागाची चमू पोहोचून कीटकनाशक फवारणी करेल.जयश्री थोटेअधिकारी, हिवताप व हत्तीरोग विभागया वस्त्यांमधील घरात आढळून आला डेंग्यू

  •  झोन लक्ष्मीनगर: कोतवालनगर, अत्रे ले-आऊट, विवेकानंदनगर, वर्धा रोड, खामला, सुरेंद्रनगर, सोमलवाडा, नीरी कॉलनी, लक्ष्मीनगर, इंद्रप्रस्तनगर, गोपालनगर, जयताळा, सोनेगाव, परसोडी, स्वावलंबीनगर, प्रतापनगर, व्यंकटेशनगर, भामटी,
  •  धरमपेठ : रविनगर, सिव्हिल लाईन्स, सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स, काटोल रोड, हजारीपहाड, दाभा, सीताबर्डी, फ्रेन्ड्स कॉलनी, काटोल रोड, रामदासपेठ, धंतोली, शिवशक्तीनगर, तेलंगखेडी, रामनगर, हिलटॉप, शिवाजीनगर, सी.पी.डब्ल्यूडी क्वार्टर.
  • हनुमाननगर : महेशनगर चंदननगर, महावीरनगर, दुबेनगर रिंग रोड, विनायकनगर, न्यू नरसाळा, घाटे ले-आऊट, हुडकेश्वर, मानेवाडा, महालक्ष्मीनगर.
  •  धंतोली : न्यू कैलासनगर, मलीकनगर, मानेवाडा, उंटखाना, नाईकनगर, जोशीवाडी, मेडिकल चौक, नरेंद्रनगर, गणेशपेठ, चंद्रनगर, बारासिग्नल व इमामवाडा.
  •  नेहरुनगर : आशीर्वादनगर, नंदनवन, हुडकेश्वर, ओमनगर, सक्करदरा, दिघोरी, उमरेड रोड, सहकारनगर, शेषनगर, भांडे प्लॉट, चंद्रमणीनगर, वाठोडा ले-आऊट, अमोलनगर, वाठोडा.
  •  गांधीबाग : हज हाऊस, गंजीपेठ, धाडीवाल ले-आऊट, जुनी मंगळवारी, टिमकी, हंसापुरी, पाटलीपुत्र गंजीपेठ, इतवारी, भालदारपुरा, महाल, नवाबपुरा, मोमीनपुरा, लकडगंज, न्यू शुक्रवारी, गांधीबाग, जागृती कॉलनी.
  • सतरंजीपुरा : पांचपावली, तांडापेठ, तुळशीनगर, इतवारी रेल्वे स्टेशन, बिनाकी ले-आऊट, शांतीनगर, कावरापेठ, दुर्गानगर, श्रीनाथ साईनगर, लकडगंज, मेहंदीबाग, प्रेमनगर.
  • लकडगंज : गुलशननगर, कळमना, भवानीनगर, पारडी, वर्धमाननगर, वैष्णवदेवीनगर, नेताजीनगर, डिप्टीसिग्नल, बगडगंज, भरतवाडा पारडी, हिवरी ले-आऊट, मिनीमातानगर, भांडेवाडी, सतनामीनगर.
  •  आशीनगर : टेका न्यू वस्ती, जवाहरनगर, क्रिष्णा कावळेनगर, विनोबा भावेनगर, सुगतनगर, टेका-नाका, मिलिंदनगर, दीक्षितनगर, लष्करीबाग, जरीपटका
  •  मंगळवारी : गोरेवाडा, झिंगाबाई टाकळी, बेझनबाग, लुंबिनीनगर, मानकापूर, जुना मानकापूर, गीट्टीखदान, नवीन मानकापूर, गोधनी.

 

टॅग्स :dengueडेंग्यूNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका