ग्रामपंचायतीकडे निधीचे विविध स्रोत : पंचायत राज व्यवस्थेने दिले ग्रामपंचायतींना विशेष अधिकार
नागपूर : केंद्र सरकारने पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला विशेष अधिकार दिले आहेत. विकासाच्या प्रक्रियेत गाव शहराच्या बरोबरीने विकसित व्हावे या उद्देशातून ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराचे संपूर्ण अधिकार सरपंचांना दिले आहे. ग्रामपंचायतीचा गोळा होणारा स्वनिधी कितीही असो
गावखेड्याचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ११४० योजना तयार केल्या आहेत. गावाच्या गरजेनुसार योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे सर्वच योजना एका गावासाठी लागू पडत नाहीत
वित्त आयोगाच्या निधीतून करावयाचा खर्च
- ग्रामपंचायतींना वित्त आयोगाच्या प्राप्त होणाऱ्या अनुदानातून १० टक्के निधी प्रशासकीय व तांत्रिक बाबींवर खर्च करायचा आहे
योजनांच्या माध्यमातून मिळतो राज्याचा निधी
- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा निधी हा ग्रामपंचायतीलाच मिळतो. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, उन्हाळ्यात दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची सर्व कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येतात. दलित वस्ती विकास कार्यक्रम, स्वच्छ भारत अभियान, आमदार आदर्श ग्राम योजना, राज्य सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या इंदिरा आवास, शबरी, रमाई योजना, गाव विजेसाठी सक्षम व्हावे म्हणून सौरविद्युत प्रकल्प योजना, ग्रामविकास भवन प्रकल्प योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मुख्यमंत्री पेयजल विकास कार्यक्रम, यशवंत ग्राम समृद्धी योजना, स्मार्ट ग्राम योजना, खासदार व आमदार निधी.
ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नाची साधने
- ग्रामपंचायत हद्दीतील घरे व मोकळ्या जागा यांवरील कर.
- पाणीपट्टी, दिवाबत्ती कर, व्यवसाय कर, यात्रा कर.
- आठवडी बाजारातून मिळणारा निधी, जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील कर.
- जमीन महसुलाच्या प्रमाणात राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान.
- जिल्हा नियोजन समितीतून जनआरोग्य व नागरी सुविधेसाठी मिळणारा निधी.
सीएसआर निधी कसा मिळविता येईल?
- ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या कंपन्यांकडून गावाचा विकास करण्यासाठी सीएसआर फंड ग्रामपंचायतीला अथवा जिल्हा परिषदेलाही देण्यात येतो. डब्ल्यूसीएलसारख्या कंपन्या ह्या आपला सीएसआर जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे जमा करतात. ग्रामपंचायतीचे सरपंच सीएसआर मिळविण्यासाठी थेट कंपनीशी संपर्क साधू शकतात.
सरपंचांचे अधिकार
- ग्रामपंचायतीच्या सरपंचाला १५ लाख रुपयांच्या कामावर खर्च करण्याचे थेट अधिकार आहेत. सरपंच हा गावाचा विकास आराखडा तयार करून, त्यासाठी निधी मिळविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो.
ग्रामपंचायतींसाठी असलेल्या स्पर्धा व पुरस्कार
- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार
- शाहू-फुले-आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना पुरस्कार
- सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा
- पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना पुरस्कार
- उत्कृष्ट पाणी व्यवस्थापन पुरस्कार
- यशवंत पंचायत राज पुरस्कार
- यशवंतराव चव्हाण गौरव ग्रामसभा पुरस्कार
- महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्कार
- निर्मल ग्राम पुरस्कार
- पंचायत सशक्तीकरण पुरस्कार
- आदर्श गाव पुरस्कार
असे आहे जिल्ह्यातील चित्र
४ ग्रामपंचायती - ७६८
४ गावे - १६१६
४ ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या - ६७०४
४ महिलांची सदस्यसंख्या - २४६४
४ पुरुष सदस्यसंख्या - २९३०
४ अनु. जाती सदस्यसंख्या - ८९८
४ अनु. जमाती सदस्यसंख्या - ८३८