शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

- तर उन्हाळ्यात भार नियमन अटळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 7:48 PM

महाजनकोला आवश्यक कोळसा मिळाला नाही तर, या उन्हाळ्यात भार नियमन अटळ आहे. सध्या महाजनकोला रोज १९ टक्के कमी कोळसा पुरवठा होत आहे. उन्हाळ्यात वाढणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महाजनकोने रोज १ लाख ५० हजार १०० टन कोळशाची मागणी केली आहे. त्यामुळे कोळसा कंपन्यांपुढे मोठे आव्हान आहे.

ठळक मुद्दे१९ टक्के कोळशाचा तुटवडा : रोज १.५० लाख टन कोळशाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाजनकोला आवश्यक कोळसा मिळाला नाही तर, या उन्हाळ्यात भार नियमन अटळ आहे. सध्या महाजनकोला रोज १९ टक्के कमी कोळसा पुरवठा होत आहे. उन्हाळ्यात वाढणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महाजनकोने रोज १ लाख ५० हजार १०० टन कोळशाची मागणी केली आहे. त्यामुळे कोळसा कंपन्यांपुढे मोठे आव्हान आहे.महाजनकोने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही स्थिती स्पष्ट केली आहे. मार्च ते जून या काळात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने उपयोगात आणणे आवश्यक आहे. त्याकरिता रोज १ लाख ५० हजार १०० टन कोळशाची गरज भासणार आहे. ७ आॅक्टोबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोळसा कंपन्यांनी महाजनकोला रोज १ लाख १९ हजार मॅट्रिक टन कोळसा देण्याचे मान्य केले होते. परंतु, आतापर्यंत महाजनकोला दर दिवशी सुमारे ९५ हजार ७७३ टन कोळसा मिळाला आहे. पुरवठ्यात रोज १९ टक्के कोळशाचा तुटवडा आहे. परिणामी, क्षमतेपेक्षा कमी वीज निर्मिती होत आहे अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे.या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने महाजनकोचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी १४ मार्च रोजी सुनावणी निश्चित केली. उच्च न्यायालयात कोळसा आयात व त्यात होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.२२ दिवसांचा साठा आवश्यकमार्गदर्शकतत्वानुसार महाजनकोच्या प्रत्येक औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात किमान २२ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा ठेवणे आवश्यक आहे. पुरेसा साठा ठेवला तरच भविष्यात येणाऱ्या अडचणींचा वीज निर्मितीवर परिणाम होणार नाही. सध्या देशातील ४६ औष्णिक प्रकल्पांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत महाजनकोच्या चंद्रपूर प्रकल्पात ४ लाख ७० हजार, पारसमध्ये ४१ हजार, परळीमध्ये १ लाख ३५ हजार, नाशिकमध्ये ६६ हजार, भुसावळमध्ये ७५ हजार, कोराडीमध्ये १ लाख ४२ हजार तर, खापरखेडामध्ये १ लाख ३८ हजार टन कोळशाचा साठा होता असे महाजनकोने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmahavitaranमहावितरण