शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

नागपूरच्या विधानभवनवर दहशतवादी हल्ला झाला तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:26 PM

दहशतवादी विधानभवन परिसरात घुसले किंवा हल्ला केला तर त्यांच्याशी कसे निपटावे यासाठी पोलीस आणि इतर विभागांतर्फे बुधवारी मॉकड्रील करण्यात आली.

ठळक मुद्देहिवाळी विधीमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर पोलिसांची मॉकड्रील

आॅनलाईन लोकमतनागपूर : विधानभवन परिसरात बुधवारी दुपारपर्यंत शांतता पसरली होती. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येथे दुरुस्तीचे काम सुरू होते आणि मार्गावरील रहदारीही सुरळीत सुरू होती. मात्र दुपारी ४ नंतर अचानक पोलिसांची गस्त वाढली. परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आणि जवळच्या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली. विधानभवन परिसरात अंधार पसरला होता. पोलीस आणि अग्निशमन विभागाची वाहने तडकाफडकी विधानभवनात घुसल्याने लोकही अवाक झाले. अगदी धावपळीने सुरू असलेल्या या कारवाईमुळे नागरिकाना कळायला मार्ग नव्हता. दहशतवादी विधानभवनात घुसल्याची माहिती आल्याने लोकांच्या हृदयाची धडधड अधिकच वाढली होती. मात्र नंतर ही वास्तविकता नसून सुरक्षा विभागातर्फे केलेली मॉकड्रील असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीने नागपूर शहरही संवेदनशील शहराच्या यादीत आले आहे. त्यामुळे दहशतवादी विधानभवन परिसरात घुसले किंवा हल्ला केला तर त्यांच्याशी कसे निपटावे यासाठी पोलीस आणि इतर विभागांतर्फे बुधवारी मॉकड्रील करण्यात आली. यासाठी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ आणि वाहने पोलीस विभागाकडून पुरविण्यात आली. पोलिसांच्या सुचनेनुसार अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या पाठविण्यात आल्या. कर्मचाºयांनी तास-दीड तास ही कारवाई केली. मीठा नीम परिसर रिकामा केलामॉकड्रील अतिशय वास्तविक वाटावी म्हणून मीठा नीम दर्गाहचा परिसर रिकामा करण्यात आला. एरवी या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्यांची व भोजनदान करणाऱ्यांची गर्दी असते. मात्र मॉकड्रीलच्या काळात नागरिकांना प्रवेशास मनाई करण्यात आली. पार्किंगलाही मनाई केली गेली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारासह इतर द्वार व आसपास परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तयारी सुरू असल्याचे लोकांना वाटले.नागपूर संवेदनशीलसंवेदनशीलतेच्या आधारावर काही शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचाही समावेश आहे. विशेषत: संघ मुख्यालयामुळे दहशतवाद्यांच्या हिटलीस्टवर नागपूर असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अशा अप्रिय घटनेशी निपटण्यासाठी एनएसजी जवानांकडून शहरात मॉकड्रील केली जात आहे. विधानभवनासह विमानतळ, वर्धा रोडवरील हॉटेल लॉ मेरिडीयन आदी ठिकाणी याआधी मॉकड्रील करण्यात आली आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाला ऐनवेळी या ठिकाणी पोहचण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यांच्यासाठीही माहिती गुप्त ठेवण्यात येते.

 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा