बीएलए व बूथ कमिट्यांची माहिती न पाठविल्यास जिल्हाध्यक्षांवर कारवाई
By कमलेश वानखेडे | Published: September 10, 2024 06:25 PM2024-09-10T18:25:08+5:302024-09-10T18:25:53+5:30
Nagpur : रमेश चेन्नीथला यांचे निर्देश : २५ सप्टेंबरची ‘डेडलाईन’
नागपूर : विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. प्रदेश काँग्रेसचे मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, असे असतानाही बहुतांश जिल्हाध्यक्षांनी बीएलए व बूथ कमिट्यांची माहिती प्रदेश काँग्रेसकडे पाठविलेली नाही. आता २५ सप्टेंबरपर्यंत ही माहिती पाठविली नाही तर संबंधित जिल्हाध्यक्षांवर कारवाई करा, असे निर्देश काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने मुंबई येथे वॉर रुम सुरु केली आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ सप्टेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत बीएलए व बूथ कमिटीबाबत चर्चा झाली होती. मात्र, अद्याप काही जिल्ह्यांनी ही माहिती प्रदेश कार्यालयाला पाठविलेली नाही. निवडणुकीसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे संबंधित माहिती २५ सप्टेंबर पर्यंत प्रदेश काँग्रेसकडे पाठवावी, असे पत्र सर्व शहर व जिल्हाध्यक्ष यांना प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रसासन नाना गावंडे यांनी पाठविले आहे.