नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या (एनव्हीसीसी) पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी चेंबरच्या प्रांगणात बॅनर दाखवून कोविड व्हॅक्सीन पेटंटमुक्त करण्याची मागणी जागतिक आरोग्य संघटनेकडे (डब्ल्यूएचओ) केली.
अश्विन मेहाडिया म्हणाले, संपूर्ण जगात गेल्या दीड वर्षांपासून कोविड महामारीने कहर केला आहे. नागरिक नियमित सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे पालन करीत आहेत. त्यानंतरही कोरोना आजारापासून सुटकारा मिळावा म्हणून सर्वांचे लवकरच व्हॅक्सीनेशन होणे आवश्यक आहे. सध्या कोविड व्हॅक्सीनचे पेटंट भारतातील काहीच कंपन्यांकडे आहे. त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात व्हॅक्सीनची निर्मिती होत नाही आणि नागरिकांना व्हॅक्सीन देण्यात अडचणी येत आहेत.
चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, कोरोना महामारीत व्हॅक्सीन घेण्याचा नागरिकांचा अधिकार आहे. भारतात कोरोनाच्या दोन लाट आल्या आहेत. त्यामुळे जन आणि धनाची हानी झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी सर्वांना व्हॅक्सीन देणे आवश्यक आहे. त्यामुळे व्हॅक्सीन पेटंटमुक्त करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे व्हॅक्सीनची निर्मिती वाढेल आणि योग्य किमतीत नागरिकांना उपलब्ध होईल. त्यामुळे कोरोना आजारापासून बचाव होणार आहे.
मागणी करताना चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, उपाध्यक्ष फारुक अकबानी, संजय अग्रवाल, सचिव रामअवतार तोतला, सहसचिव उमेश पटेल, शब्बार शाकीर, स्वप्निल अहिरकर, जनसंपर्क अधिकारी राजवंतपाल सिंग तुली उपस्थित होते.