शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

वाहतूक नियम तोडत असाल तर, सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:31 AM

शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियम तोडणे चांगलेच महागात पडत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल-२०१७ ते आॅक्टोबर-२०१८ पर्यंत १५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले आहेत. तसेच, वाहतूक विभागाने वाहतूक नियम तोडणाऱ्या २ लाख ८६ हजार ३३८ व्यक्तींपैकी १ लाख ३ हजार ९४१ व्यक्तींना चालान तामील केले आहेत.

ठळक मुद्दे१५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द१ लाख ३ हजार ९४१ वाहनचालकांना चालान तामील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियम तोडणे चांगलेच महागात पडत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल-२०१७ ते आॅक्टोबर-२०१८ पर्यंत १५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले आहेत. तसेच, वाहतूक विभागाने वाहतूक नियम तोडणाऱ्या २ लाख ८६ हजार ३३८ व्यक्तींपैकी १ लाख ३ हजार ९४१ व्यक्तींना चालान तामील केले आहेत.विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी गत १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष उपसमितीच्या बैठकीचे इतिवृत्त मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. त्यात ही माहिती देण्यात आली. इतिवृत्तातील अन्य माहितीनुसार, न्यायालयाने वाहतूक सिग्नल व वाहतूक पोलिसांच्या वेतनाचा खर्च वाहतूक नियम तोडणाºयांवर अतिरिक्त दंड आकारून वसूल करता येऊ शकतो का, अशी विचारणा केली होती. त्यानुसार, सरकारला प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शहरातील ७०० चौकांत ३,९१२ सीसीटीव्ही कॅमेरे लावणे प्रस्तावित असून, त्यापैकी ३,६८२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सध्या ३०४ कॅमेरे विविध कारणांमुळे काढण्यात आले आहेत किंवा बंद आहेत. भरारी पथकाने शाळा-महाविद्यालयात जाऊन ६१४ विद्यार्थ्यांवर कारवाई केली व त्यांच्याकडून ३ लाख २२ हजार रुपये दंड वसूल केला. महापालिकेने पार्किंग व्यवस्था नसलेल्या ६५ शिकवणी वर्ग संचालकांना नोटीस बजावली.शहरात ४५७ गोठ्यांकडे परवाने असून, ५८९ गोठे विनापरवाना सुरू आहेत. आतापर्यंत ७९४ जनावरांचे टॅगिंग करण्यात आले आहे. परवाना नूतनीकरण व जनावरांचे टॅगिंग न करणाºया ३५ गोठ्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. वाहतूक विभागाने मोकाट जनावरांच्या ३० मालकांवर कारवाई केली आहे. मोरभवन येथून सध्या राज्य परिवहन महामंडळ व मनपा बसेसच्या १५०० वर फे ºया होतात. अशा परिस्थितीत चंद्रपूर, वर्धा, अमरावती व काटोल मार्गाच्या बसेस सुरू केल्यास १००० फे ºया वाढून वाहतूककोंडी होईल, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.नंदग्राम प्रकल्पाचा आराखडा सादरगोठे शहराबाहेर स्थानांतरित करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नंदग्राम प्रकल्पाचा आराखडा नगर रचना विभागाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. हा प्रकल्प १९.३९ हेक्टर जमिनीवर उभारला जाणार आहे. प्रकल्पात १० जनावरांसाठी १ याप्रमाणे ४६८ गोठे बांधले जाणार आहेत.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयtraffic policeवाहतूक पोलीस