महपालिका : १८ मे अंतिम मुदतनागपूर : पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेने गोपनीय अहवाल(सीआर)लिहिण्याची पद्धती सुरू केली आहे. अधिनस्त असलेल्या कर्मचार्यांचे सीआर लिहिण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. कर्मचार्यांचे सीआर न लिहिणार्या अधिकार्यांची वेतनवाढ रोखली जाणार आहे. १८ मे पर्यंत विभाग प्रमुखांना त्यांच्या विभागातील कर्मचारी व अधिकार्यांचे सीआर सामान्य प्रशासन विभागाकडे लिहून पाठविणे अनिवार्य आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून विभागप्रमुख या कामात व्यस्त आहेत. यात अ प्लस, अ, बी प्लस, बी आणि बी उणे अशा स्वरूपाचा सीआरवर शेरा लिहिला जाणार आहे. वर्ग १ च्या अधिकार्यांच्या सीआर सलग पाच वर्षापासून अ प्लस वा अ असेल तर त्यांना पदोन्नतीसाठी पात्र ठरविले जाईल. वर्ग २ साठी बी प्लस वा बी असणे अनिवार्य आहे. कर्मचार्यांचे वर्षभरातील कामकाज विचारात घेऊ न सीआर लिहिला जातो. तो चांगला असो वाईट संबधित कर्मचार्यांना दाखविणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी) प्रशासनाला पाठविणारमनपातील सर्व कर्मचार्यांचे गोपनीय अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविले जाणार आहे. या विभागाकडे सर्व कर्मचार्यांची माहिती संग्रहित ठेवली जात असल्याची माहिती अपर आयुक्त हेमंत पवार यांनी दिली.
सीआर न लिहिल्यास वेतनवाढ रोखणार
By admin | Published: May 06, 2014 10:40 PM