लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता राज्य सरकार करीत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर धनगर समाजाला झुलवत ठेवले. परंतु आता तसे होणार नाही. वेळ पडल्यास समाजाच्या आरक्षणासाठी राजीनामा देऊ अशी रोखठोक भूमिका राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर रविवारी व्यक्त केली.धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने स्नेहनगर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जानकर बोलत होते.व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे संयोजक खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार नारायण कुचे, तानाजी मुटकुळे, गणेश हाके, डॉ. राजीव पोतदार, बाबुराव शिंदे यांच्यासह धनगर आरक्षण संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुनिता महात्मे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुभाष लिंगाटे यांनी मानले. या कार्यक्रमास राज्यभरातील धनगर समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.तांत्रिक अडचणींचा विचार : अहिरधनगर समाजाची आरक्षणाची मागणी नवीन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास, अशी ग्वाही दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांना मंत्रिमंडळात संधी दिली. आरक्षणाची मागणी पूर्ण करताना तांत्रिक अडचणींचा विचार करावा लागेल. आरक्षणासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे. आरक्षणासोबतच अन्य मार्गानेही उन्नती शक्य असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले.आरक्षणाचा निर्णय घ्या : महात्मेमेळाव्याचे संयोजक डॉ. विकास महात्मे म्हणाले की, आरक्षणाचे शिफारस पत्र केंद्राकडे पाठविणारे देवेंद्र फडणवीस हे गेल्या ७० वर्षातील पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. महाराष्ट्र शासन या बाबतीत अतिशय योग्य कार्यवाही करत असून धनगर समाजाच्या बाजूने निर्णय घेतला जाईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री हे धनगर आरक्षणासंबंधी सकारात्मक व प्रामाणिक असून टीसचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे ते तातडीने शिफारस करतील. असा विश्वास महात्मे यांनी व्यक्त केला. यासोबतच वसतिगृह, शिष्यवृत्ती, भटक्या विमुक्तासाठी स्पर्धा परीक्षा विशेष प्रशिक्षण संस्था, शेफर्ड कमिशनची स्थापना, मेंढपाळचे प्रश्न आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.आता नाही तर कधीच नाही : शिंदेगेल्या ७० वर्षांत धनगर समाजाची फसवणूक झाली. सत्तेसाठी आश्वासन देतात व नंतर विसरून जातात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धनगर समाजामुळे मुख्यमंत्री झाल्याची कबुली दिली. आरक्षणाबाबतही ते गंभीर आहेत. आता अरक्षण मिळाले नाही तर भविष्यात कधीच मिळणार नाही, अशी भूमिका जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मांडली.
तर वेळ पडल्यास राजीनामा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 1:42 AM
धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता राज्य सरकार करीत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर धनगर समाजाला झुलवत ठेवले.
ठळक मुद्देपशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर : धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने नागपुरात मेळावा