शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कपात

By admin | Published: July 11, 2016 2:42 AM

अनुदानित आश्रम शाळेत कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विनाअनुमती आंदोलन व संघटनांच्या सभेत सहभाग घेतल्यास संबंधित शिक्षक ..

प्रकल्प अधिकाऱ्यांचे निर्देश : प्रतिनिधींवर अंकुशनागपूर : अनुदानित आश्रम शाळेत कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विनाअनुमती आंदोलन व संघटनांच्या सभेत सहभाग घेतल्यास संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येणार आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. आदिवासी आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी पूर्वपरवानगी न घेता अनुपस्थित राहात असल्याचे संस्थाचालकांनी प्रकल्प अधिकऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत निदर्शनास आणले होते. अनेकदा शिक्षक व कर्मचारी वैयक्तिक कामासाठी रजा न घेता अनुपस्थित राहतात. याचा परिणाम शैक्षणिक कार्यावर पडतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन देयके एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात परस्पर सादर न करता संस्थेचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पाठविण्यात यावे. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या अनुमतीनेच मुख्यालय सोडावे. याबाबतची नोंद दस्तऐवजात करावी. तसेच अनुदानित आश्रम शाळा निवासी असल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांनी निवासी राहावे. परिसरात निवासाची व्यवस्था नसल्यास पाच किलोमीटर परिसरात निवास असावा. त्याशिवाय घरभाडे भत्ता मिळणार नाही, अशी सूचना या परिपत्रकातून केली आहे. (प्रतिनिधी)