शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘नोटा’ वापरले तर तोटा होईल; सरसंघचालकांचे सूचक वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:13 AM

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच्या अखेरच्या विजयादशमी उत्सवातून पाथेय देताना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत निवडणुकांवर काही भाष्य करतात का याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते.

ठळक मुद्देकेंद्र सरकारला काढले चिमटे

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच्या अखेरच्या विजयादशमी उत्सवातून पाथेय देताना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत निवडणुकांवर काही भाष्य करतात का याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते. मतदानादरम्यान ‘नोटा’ वापरले तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे सद्यस्थितीत जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी सर्वोत्तम व राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मत द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण देशात पसरलेले स्वयंसेवक मोठ्या संख्येने नागरिक म्हणून कर्तव्य पूर्ण करुन राष्ट्रहिताच्या बाजूने आपली शक्ती उभे करतील हे सूचक वक्तव्य करत त्यांनी स्वयंसेवकांना लोकसभा निवडणुकांसाठी अप्रत्यक्षपणे द्यायचा तो संदेशच दिला.पक्षीय राजकारण, जातिसंप्रदायांच्या प्रभावाचे राजकारण यापासून संघ सुरुवातीपासूनच दूर राहत आला आहे व पुढेदेखील दूरच राहणार. मात्र संघाचे स्वयंसेवक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडत असतात. मतदारांनी राष्ट्रहिताला सर्वतोपरी मानत स्वार्थ, संकुचित भावना, भाषा, प्रांत, जाती यापलिकडे जाऊन विचार केला पाहिजे.उमेदवाराची प्रामाणिकता व क्षमता, पक्षाच्या धोरणाची राष्ट्रहितासोबतची प्रतिब्धता तसेच वर्तमान कार्यांचे अनुभव याआधारावर मतदारांनी मत दिले पाहिजे. मतदान न करणे किंवा ‘नोटा’च्या अधिकाराचा उपयोग करणे हे सर्वात अयोग्य असलेल्या उमेदवाराला फायदा पोहोचविणारे ठरते.त्यामुळेच १०० टक्के मतदान आवश्यक आहे. भारताच्या निवडणूक आयोगाकडून १०० टक्के मतदानाचा आग्रह धरला जातो. या कर्तव्याचे पालन संघाचे स्वयंसेवक नेहमीप्रमाणे यंदादेखील करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारला काढले चिमटेयावेळी सरसंघचालकांनी केंद्र शासनाच्या कामाच्या गतीवरुन चिमटे काढले. स्वातंत्र्यानंतर कुठल्याच सरकारच्या कामाची गती वेगवान राहिली नाही. वर्तमान स्थितीतदेखील हेच चित्र आहे. शासनाच्या चांगल्या धोरणांवर प्रशासनाकडून तत्परता, संवेदनशीलता, पारदर्शकता व संपूर्णता दाखवत पावले उचलली गेली पाहिजे. मात्र असे आवश्यक त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येते. इंग्रज केवळ आपल्या राज्यांवर सत्ता चालविण्याचे काम करायचे. आता स्वतंत्र भारतात आपल्या शासकांनी प्रशासनाला प्रजापालक प्रशासन बनवावे ही अपेक्षा आहे, असे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकMohan Bhagwatमोहन भागवत