शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करा - नाना पटोले 

By कमलेश वानखेडे | Published: September 07, 2023 6:57 PM

पटोले म्हणाले, कुणालाही जात प्रमाणपत्र द्यायचे असेल तर त्याच्या मुळात जावे लागते.

नागपूर: बंजारा व मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आले. भाजप ने सत्तेसाठी चूक केली, ती भूमिका आता त्यांच्या अंगलट येत आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर जातीनिहाय जनगणना करा. कुणाच्या तोंडचा घास हिसकावून घेऊ नका, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी नागपुरात मांडली.

पटोले म्हणाले, कुणालाही जात प्रमाणपत्र द्यायचे असेल तर त्याच्या मुळात जावे लागते. कागदपत्रांची पडताळणी करून ते कोणत्या जातीचे आहेत हे ठरवावे लागते. त्याची एक प्रक्रिया आहे. सरकारला नियमाप्रमाणे ह्या गोष्टी करता येत नाही. कोणत्याही व्यक्तीला कोणत्या जातीत टाकता येत नाही. जे करू शकतं नाही त्याला सरकारने नाही म्हणावे. ओबीसी ही आग आहे. या आगीत सरकारने पडू नये, असा इशाराही त्यांनी दिला. - जंगलातील जनारांची मोजणी होते. मग माणसाची का होऊ नये. जातीनिहाय जनगणना हा यावर उपाय आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणीही पटोले यांनी केली. फडणवीस यांनी मराठ्यांना १६ टक्के आरक्षण देण्याची भूमिका मांडली होती. तीच भूमिका आता मनोज जरांगे पाटील मांडत आहेत. ओबीसी मधून आरक्षण नको ही मूळ मागणी मराठा समाजाने केली होती. आता दोन समाजात भांडणे लावून भाजप राज्यात मणिपूर करू इच्छित आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

केंद्रात सरकार आल्यास आरक्षणाची ५० टक्के मर्यादा उठविणारआमचे सरकार केंद्रात आले तर कुणाचाही वाटा न हिसकावता हिसकावत आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविली जाईल, असे आश्वासन पटोले यांनी यावेळी दिले. सर्व समाज बांधवांनी आक्रमक न होता संयम बाळगावा, असे आवाहानही त्यांनी केले. 

टॅग्स :nagpurनागपूरNana Patoleनाना पटोलेMaratha Reservationमराठा आरक्षण