लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सर्व समाजाला सोबत घेऊन चलण्याची काँग्रेसची परंपरा आता दिसत नाही, अल्पसंख्यकांना गृहित धराल तर फटका बसेल असे स्पष्ट मत माजी मंत्री अनिस अहमद यांनी व्यक्त केले आहे. आज सोमवारी नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत आले होते. यावेळी त्यांच्याशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, काँग्रेससाठी काम करेन पण अल्पसंख्यकांवर अन्याय होतो आहे. काँग्रेस पक्षाने आजवर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चलण्याची परंपरा राखली आहे. आता जर पक्ष अल्पसंख्यकांना गृहित धरेल तर त्याला फटका बसू शकेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
अल्पसंख्यकांना गृहित धराल तर काँग्रेसला फटका बसेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 1:11 PM
सर्व समाजाला सोबत घेऊन चलण्याची काँग्रेसची परंपरा आता दिसत नाही, अल्पसंख्यकांना गृहित धराल तर फटका बसेल असे स्पष्ट मत माजी मंत्री अनिस अहमद यांनी व्यक्त केले आहे.
ठळक मुद्देअनिस अहमद यांनी व्यक्त केली नाराजी