लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मध्ये पहिल्या तीन ‘बॅच’मध्ये सर्व जागा भरल्या गेल्या नव्हत्या. मात्र मागील तीन वर्षात संस्थेच्या ‘प्लेसमेन्ट’चा टक्का वाढला असून यंदा विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी पसंती मिळते आहे. यंदा ‘आयआयएम-नागपूर’च्या सर्व जागांवर प्रवेश होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे घोषणा झाल्यानंतर सर्वात वेगाने ‘आयआयएम-नागपूर’चे वर्ग २०१५ मध्ये प्रत्यक्षात सुरू झाले. देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे संस्थेचे पालकत्व देण्यात आले आहे व तेथील अनेक प्राध्यापक नागपुरातदेखील धडे देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या येथे उड्या पडतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात एकाही वर्षी येथील पूर्ण जागांवर प्रवेश झाले नाहीत. पहिल्या वर्षी ‘पीजीपी’ (पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेन्ट) या अभ्यासक्रमात ६० पैकी ५३ प्रवेश झाले होते तर मागील वर्षी हीच संख्या ५७ इतकी होती.मात्र मागील तीन वर्षांत ‘आयआयएम-नागपूर’ने शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावरच भर दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०१७-१८ मध्ये तर १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेन्ट’ झाले. मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी ‘पॅकेज’मध्ये १४ टक्क्यांची वाढ दिसून आले. विशेष म्हणजे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या ‘फोकस’वरदेखील ‘आयआयएम-नागपूर’ आले आहे. या बाबी लक्षात घेता यंदा विद्यार्थ्यांनी ‘आयआयएम-नागपूर’ला पसंतीक्रमात वरचे स्थान दिले आहे व अनेकांनी प्रवेश निश्चित केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ९ जुलै रोजी ‘आयआयएम-नागपूर’मध्ये नोंदणी होणार आहे. तत्पुर्वी २९ जून रोजी पुढील प्रवेश फेरीसाठी यादी जारी करण्यात येणार आहे.
‘आयआयएम’चे प्रवेश होणार ‘फुल्ल’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:13 PM
महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मध्ये पहिल्या तीन ‘बॅच’मध्ये सर्व जागा भरल्या गेल्या नव्हत्या. मात्र मागील तीन वर्षात संस्थेच्या ‘प्लेसमेन्ट’चा टक्का वाढला असून यंदा विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी पसंती मिळते आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडून मिळतेय पसंती‘प्लेसमेंट’चा टक्कादेखील वाढतोय